एक्स्प्लोर

Chandrapur Crime News: लग्नसराईची धामधूम, उन्हाळ्यात दूध उत्पादन घटलं, बदमाशांनी दीड लाखांचं बनावट पनीर बाजारात आणलं!

Chandrapur Crime News : चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दीड लाख रुपयांचे 472 किलो बनावट पनीर जप्त केलंय. या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर : सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम बघायला मिळत आहे. दरम्यानच्या या काळात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी देखील होते. मात्र उन्हाळा लागताच दुधाचं उत्पादन कमी झाल्याने दूध, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थ ज्यादा किमतीत देखील विकले जातात. याच संधीचा फायदा घेत भेसळयुक्त आणि बनावट पनीर विक्रीचा सुळसुळाट देखील बघायला मिळतो. असाच एक प्रकार चंद्रपूर (Chandrapur Crime News)  शहरात उघड झाला आहे. यात सुमारे दीड लाखांचे 472 किलो बनावट पनीर जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

सुमारे दीड लाखांचं बनावट पनीर जप्त, चंद्रपूरात खळबळ! 

पुढे आलेल्या माहितीनुसार,  पनीरच्या नावाखाली चीज अनॅलॉगची विक्री करण्याचा प्रकार पोलिसांनी हाणून पडला आहे. उन्हाळा लागताच दुधाचं उत्पादन कमी झाल्याने आणि लग्न सराईचे दिवस असल्याने पनीरची बाजारात मागणी वाढली आहे. मात्र याचाच फायदा घेत बनावट पनीर बाजारात विकल्या जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. अशातच चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दीड लाख रुपयांचे 472 किलो बनावट पनीर जप्त केलंय. या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर शहरातील सपना डेली नीड्स या दुकानातून चीज अनॅलॉग हा अन्नपदार्थ पनीर म्हणून विक्री करत असल्याचे लक्षात आल्यावर ही धाड टाकण्यात आली. या धाडीत सुमारे 197 किलो साठा जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत शहरातील मुख्य गोल बाजार परिसरातील न्यू भाग्यश्री घी भंडार या दुकानातून 275 किलो हाच पदार्थ जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाईतील नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.

पुण्यातील भेसळयुक्त पनीर बनविण्याच्या कारखान्यावर छापा

पुण्यातील मांजरी खुर्द येथील कारखान्यावर पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी करत भेसळयुक्त पनीर जप्त केल आहे. पोलिसांच्या या छापेमारीत सुमारे 1400 किलो पनीर जप्त केलंय. हे पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती पुढे आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या युनिट 6 मधील कर्मचाऱ्यांना एका कारखान्यात भेसळयुक्त पनीर बनविले जात असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी ही बाब अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवली. पोलिसांनी आणि औषध प्रशासन विभागाने या कारखान्यावर संयुक्त कारवाई केली. या कारवाईत कारखान्यातून 400 किलो जीएमएस पावडर, 1800 किलो एस एम पी पावडर, 718 लिटर पामतेल तसेच 1400 किलो भेसळयुक्त पनीर असा 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. 

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhjinagar: मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
मतमोजणीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा, पोलिसांकडून कार्यकर्त्याला लाठीचार्ज, नेमकं काय घडलं?
Maharashtra Zilla Parishad Election 2026: इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
इकडं मनपा निवडणुकीचा निकाल तिकडं आजपासून जिल्हा परिषदांची रणधुमाळी आजपासून रंगणार
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
Embed widget