Chandrapur Crime News :चंद्रपूरच्याचिमूरतालुक्यातूनएकअतिशयखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. मटणाच्या भाजीवरून (Mutton Curry) झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावावर कुऱ्हाडीने घावघालत खून (Crime News) केल्याचीघटनाघडलीआहे. चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील काल (2 सप्टेंबर) संध्याकाळच्यासुमारासही घटना घडलीआहे. बहिणीला दिलेल्या पाहुणचाराच्या मटणाच्या भाजीवरून उफाळलेला किरकोळ वादातून ही घटना झाल्याची माहितीचंद्रपूर पोलिसांनी दिली आहे. भावंडातीलकिरकोळवादातून रक्तरंजितराड्यातपरावर्तितझालेल्यायाघटनेनंसंपूर्णजिल्हाहादरलाअसूनपरिसरातमोठीखळबळउडालीआहे. (Chandrapur Crime News)

Continues below advertisement

Chandrapur Crime News: भावंडातील किरकोळ वादाचा रक्तरंजित शेवट, लाहान भावाचा जागीच दुर्दैवी अंत

मिळालेल्यामाहितीनुसार, रमेश श्रीराम बनकर (वय 55) असे मृत भावाचे नाव असून हत्या करणारा मोठा भाऊ जगन श्रीराम बनकर (वय 60) याला भिसी पोलिसांनी अटक केली आहे. रक्षाबंधनानिमित्त बहीण घरी आल्याने तिच्या स्वागतासाठी मटणाचा बेत आखण्यात आला होता. बहीण राखी बांधून परतल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उरलेल्या मटणाच्या भाजीवरून जगन आणि रमेश यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोघेही दारूच्या नशेत धुंद असल्याने वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात सनकी जगनने घरात असलेली कुऱ्हाड उपसली आणि रमेश यांच्या मानेवर व डोक्यावर प्राणघातक प्रहार केले. कुऱ्हाडीचे खोल वार बसल्याने रमेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताने माखलेला मृतदेह ताब्यात घेतला. आरोपी जगन बनकर याला भिसी पोलिसांनी अटक केली आहे.

Continues below advertisement

Chandrapur News: इरई आणि झरपट नदीची संयुक्त पाहणी करण्याचे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

चंद्रपूर जिल्ह्यातील इरई आणि झरपट नद्यांच्या खोलीकरणाचं काम व्यवस्थित सुरू आहे की नाही याबाबत पाहणी करण्याचे मुंबई हायकोर्टाच्या नागपूरखंडपीठाने आदेश दिले आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड आणि याचिकाकर्त्यांनी ही संयुक्त पाहणी करावी, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी ही याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये या नद्यांच्या खोलीकरणाचं काम व्यवस्थित होत नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. या याचिकेवर काल सुनावणी करताना हायकोर्टाने हे आदेश देत पाहणी अहवाल 21 ऑक्टोंबरपर्यंत सादर करण्यास सांगितलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या