एक्स्प्लोर

Chandrapur Crime : मोठी बातमी! चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सायबर गुन्हेगारांचा डल्ला; कोट्यांवधीची रक्कम लंपास 

Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारल्याची माहिती पुढे आली आहे. यात तब्बल 3 कोटी 70 लाख रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारला असल्याचे पुढे आले आहे.

Chandrapur Crime News:  चंद्रपूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime News) डल्ला मारल्याची माहिती पुढे आली आहे. यात तब्बल 3 कोटी 70 लाख रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी (Crime News) डल्ला मारला असल्याचे पुढे आले आहे. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक व्यवहारांमध्ये सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर रक्कम वळते केल्याचे सांगितलं जातंय. 

दिल्ली, नोएडा येथील खात्यांवर रक्कम परस्पर वळते

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून RTGS केलेली रक्कम नागपूर येथील येस बँकच्या माध्यमातून होते लाभार्थी (Beneficiary) च्या खात्यात जमा होते. अशातच 7 आणि 10 फेब्रुवारी या दोन दिवसात 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँक 'मेकर आणि चेकर' आहेत. तर बेनिफिशरी बँक येस बँक असल्याचे सांगितलं जातंय. मात्र आरटीजीएस (RTGS) केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याने संशय आला. दरम्यान चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्थानकात अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर यातील गुन्हेगारांना अटक करण्याचे मोठे आव्हान आता पोलीसांपुढे असणार आहे.  

बँकेत पैसे जमा करायला गेले, तेवढ्यात चोरट्यांचा डल्ला!

बँकेत पैसे जमा करायला गेलेल्या व्यक्तीच्या कारमधील  2 लाखाची रोकड पळविण्याची घटना नागपूर लगतच्या वानाडोंगरी (महाजन वाडी) येथील हिंगणा मार्गावर असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या समोर घडली.  भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात धास्ती पसरली आहे. भाऊराव  काळे  यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतातील तूर -कपाशी हे पीक विकले होते. त्याचेच आलेले अडीच लाख रुपये घेऊन ते ट्रान्सपोर्टच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी घरून निघाले.

त्यांच्या सोबत त्यांचा एक मित्र सुद्धा होता. हे दोघेही हिंगणा येथे काही काम उरकून नागपूरकडे जाताना वाटेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये त्यातील पन्नास हजार रुपये बँकेत जमा करण्यासाठी त्यांनी काढले व उर्वरित दोन लाख ही रक्कम कारच्या समोर असलेल्या हॅन्डब्रेक जवळ तशीच ठेवून बँकेत गेले. दरम्यान, काही वेळानंतर काम आटपून बाहेर पडले. तर त्यांना चालकाच्या दुसऱ्या बाजूच्या दाराची काच फुटलेली दिसली आणि आतील पैसेसुद्धा चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी लागलीच पोलीसाना सूचना दिली. या घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत. 

 इतर महत्वाच्या  बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget