एक्स्प्लोर

Buldhana Police: बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!

Buldhana Shivani Kalmekar Criem Case : बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड (Shivani Kalmekar Crime Case)  प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Buldhana Shivani Kalmekar Criem Case : बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड (Shivani Kalmekar Crime Case)  प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर(Police Inspector Sunil Ambulkar)आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील (Police Inspector Nitin Patil) यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कुठलीही कारवाई झाले नाही. त्यामुळे तपासात मार्गदर्शन करणाऱ्या पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांवर कारवाई कधी? असा प्रश्न विचारला जातोय.

दरम्यान, या प्रकरणाची दखल पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली असून खास याच प्रकरणासंबंधी माहिती घेण्यासाठी सदानंद दाते हे अमरावती येथे येणार असल्याची माहिती आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांना स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी यावं लागत असल्याने पून्हा यात काय ट्विस्ट येतो व दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काय करवाई होते हे बघणं महत्वाचं असेल.

Shivani Kalmekar Case: ...तर तुमच्या सर्व कुटुंबाला उचलून नेऊ, पाच लाख रुपये पोलिसांनी मागितल्याचा गौप्यस्फोट

बुलढाण्यातील बहुचर्चित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणात अजून एक नवीन वळण मिळाल आहे. आपल्याच मुलीची न केलेल्या हत्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांनी मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील खडकी येथील आदिवासी समाजाच्या बापूराम कळमेकर व अजय कळमेकर पिता पुत्रांना 22 दिवस जेलमध्ये (Crime) डांबून ठेवलं होतं. मात्र शिवानी बुलढाणा पोलिसांसमोर जिवंत हजर झाल्याने बुलढाणा पोलिसांच बिंग फुटलं आणि पिता पुत्राला न्यायालयाने दोषमुक्त केल. हे प्रकरण "एबीपी माझा" ने लावून धरल्यानंतर आणि जेलमधून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कळमेकर पिता पुत्रांनी 'एबीपी माझा' शी बोलताना "पोलिसांनी आम्हाला कुठलाही त्रास दिला नाही, आम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केला त्यामुळे आम्ही दोषी आहोत' असं सांगितलं होतं, मात्र आता कळमेकर पितापुत्राने पोलिसांवर मोठा आरोप केल्याचा एक व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. 

कळमेकर पिता पुत्राने. 'पोलिसांनी आम्हाला जंगलात फिरवून मोठ्या प्रमाणात मारहाण केली, ही हत्या तुम्हीच केली, असं तुम्ही नाही सांगितलं तर तुमच्या सर्व कुटुंबाला उचलून नेऊ..' मारहाण करत आमच्याकडून हा खून आम्हीच केला असं कबूल करून घेतलं, तसंच आम्हाला सोडायचं असल्यास पाच लाख रुपये पोलिसांनी मागितल्याचा गौप्यस्फोट एका व्हिडिओद्वारे कळमेकर पिता पुत्रांनी केला आहे. हा व्हिडिओ 'एबीपी माझा' च्या हाती लागला आहे. यामुळे मात्र बुलढाणा पोलीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सदर संपूर्ण घटना क्रमावर "एबीपी माझा" चे काही सवाल- (Jalgaon Crime News)

1- कुठलाही सबळ पुरावा नसताना बुलढाणा पोलिसांनी आदिवासी समाजाच्या पिता-पुत्रांना का अटक केली..? 

2- डीएनए अहवाल यायच्या आधीच तो मृतदेह शिवानीचाच आहे असा अंदाज पोलिसांनी कसा बांधला...?

3 - पोलिसांनी पिता-पुत्राला अटक केल्यानंतर न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती या सहा दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला..?

4- अनोळखी मृतदेहाची ओळख पटविल्याविनाच पोलीस निष्कर्षावर कसे पोहोचले...? त्यांचा काय हेतू होता..?

5- अनोळखी मृतदेहाचं प्रकरण दडपण्यासाठी तर शिवानी बनावट हत्याकांड घडवून आणलेलं तर नाही..?, याव्यतिरिक्तही या प्रकरणात अनेक सवाल उठतात. मात्र सध्या तरी बुलढाणा पोलीस दलातील कुठलाही वरिष्ठ अधिकारी यावर बोलण्यास तयार नाही.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द, उंदीर आणि माशांचा वावर;16 ठिकाणी छापेमारी
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Embed widget