बुलढाणा : राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) कारवाईचा धडाका पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यात विभागाने जोरदार कारवाई करत अनेक सरकारी अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, शिपायापासून ते उपजिल्हाधिकारी पदापर्यंतच्या अधिकाऱ्यांनाही लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. आता, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात पुन्हा एकदा एसीबीने कारवाई करत विस्तार अधिकाऱ्यास लाच (Bribe) घेताना रंगेहात अटक केली. जळगाव जामोद पंचायत संमतीतील विस्तार गट विकास अधिकारी संदीप मोरे यास 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये मोठी कारवाई केली असून जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्याकडून शासकीय काम करून देण्यासाठी संदीप मोरे याने तब्बल 25 हजाराची लाच मागितली होती. विशेष म्हणजे लाचखोर संदीप मोरे हा बुलढाण्यात अनेक समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला अधिकारी आहे. मात्र, समाजापुढे समाजभूषणचा चेहरा दाखवणाऱ्या सचिन मोरेचा बुरखा फाटला असून त्याचा खरा चेहरा समाजासमोर आला आहे. या कारवाईनंतर जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

सहायक निबंधकासही अटक

राज्यभरात मागील काही महिन्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच, 15 दिवसांपूर्वी बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहाय्यक निबंधकासह त्यांच्या सहकाऱ्यांना 13 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती. सूरज जगदाळे आणि सहकार अधिकारी सतीश शेरखाने यांना 13 हजार रुपयांची लाच घेताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक करत मोठी कारवाई केली. दरम्यान, या कारवाईनंतर बीड जिल्हाभरात खळबळ उडाली होती.

Continues below advertisement

हेही वाचा

मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश