Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील दुधलगाव परिसरात शेतात मजूर म्हणून असलेल्या एका 19 वर्षीय आदिवासी महिलेवर 18 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्राच्या धाकावर अत्याचार (Buldhana Crime News) केल्याचीसंतापजनकघटनाघडलीहोती. अखेरमहिनाभरानंतरअत्याचार करणाऱ्या दोन नराधमांना बेड्या (Crime News) ठोकण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळालं आहे. तब्बल 40 दिवस बुलढाणा पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल व तांत्रिक तपास करत मध्यप्रदेशातील बुऱ्हानपूर तालुक्यातून या दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.
दरम्यान, यावेळी आरोपींनी कुठलाही पुरावा न सोडल्याने अतिशय क्लिष्ट व तांत्रिक तपास करत बुलढाणा पोलिसांनी या गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली.
Samruddhi Highway Robbery : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची विशेष गस्त वाढणार
अलीकडेच समृद्धी महामार्गावर प्रवास करताना व्यवसायिकाला लुटण्याची घटना समोर आली. समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहन लुटीच्या घटना बघून बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी समृद्धी महामार्गावर 24 तास गस्त घालण्यासाठी दोन पथकांची नेमणूक केली आहे.
समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलीस विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलल आहे. महामार्गावरील चोरी, दरोडे व लूटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष गस्त वाढविण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते दोन नवीन पोलीस वाहनांचे उद्घाटन करण्यात आले. या वाहनांद्वारे महामार्गावर नियमित गस्त घालून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाणार असून, आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तातडीने पोलीस मदत मिळणार आहे.
Samruddhi Highway Robbery : समृद्धी महामार्गावरील दरोडाच्या सूत्रधार बीड मधून जेरबंद
समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मालडहून व दृशिंगपूर शिवारात गेट क्रमांक 538 ते 543 दरम्यान गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी उच्छाद मांडला होता. याच दरोडेखोरांच्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी बीडच्या शिरूर तालुक्यातून अटक करतबेड्याठोकल्याआहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार किरण अजिनाथ गायकवाड (राहणार हिवरसिंगा) याला तांत्रिक आणि गुप्तहेरांच्या माहितीवरून पोलिसांनी अटक केलीय. दरोडेखोरांच्या इतर साथीदारांचाही पोलिसांकडून शोध सुरू. या दरोडेखोरांनी खिळे आणि टोकदार लोखंडी पट्ट्यांचा वापर करत वाहनांचे टायर पंचर केले होते. त्यानंतर प्रवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून बेदम मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटली गेली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
