Buldhana Crime News: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जळगाव जामोद (Jalgaon Jamod) येथे तीन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. टेक्निकल क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघालेल्या या तिन्ही मुली बस स्थानकात शेवटच्या दिसल्या, त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा मिळालेला नाही. या घटनेमुळे स्थानिक परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Continues below advertisement

Buldhana Crime News: क्लासला जातोय सांगून घरातून निघाल्या आणि गायब झाल्या

तेजस्विनी गजानन वसुले, सानिका श्रीराम ताडे आणि चंचल श्रीकृष्ण मोहे या तिन्ही मुलींचे वय अंदाजे 16 वर्षे असून त्या जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव गावातील आहेत. नेहमीप्रमाणे त्या टेक्निकल क्लाससाठी घरातून निघाल्या. काही मैत्रिणींनी त्यांना जळगाव जामोद बस स्थानकात पाहिल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर त्या कोठे गेल्या याचा कोणताही पुरावा समोर आला नाही.

Buldhana Crime News: पोलिसांसमोर शोध घेण्याचे मोठे आव्हान 

मुली परत न आल्याने त्यांच्या पालकांनी जळगाव जामोद पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. मात्र या तिन्ही मुली कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांसमोर मुलींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अल्पवयीन मुलींचा पत्ता न सापडल्याने आणि जबरदस्ती किंवा फुस लावून नेण्याची शक्यता तपासात दिसून आल्याने जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या तीन अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

दरम्यान, या तिन्ही मुली ज्या शाळेत शिकत होत्या, त्या शाळेच्या व्यवस्थापनाने तिन्ही मुलींच्या पालकांना शाळेत बोलावलं होतं. या तिन्ही मुलींना ही माहिती मिळाल्यानंतर त्या अचानक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक म्हणजे तिन्ही मुलींनी बँक पासबुक सोबत नेल्याची पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली. आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Gondia Crime News: गोंदियात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक

दरम्यान, गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने पाचवीत शिकणाऱ्या 10 वर्षीय विद्यार्थिनीशी अनेक महिन्यांपासून अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनीच्या वर्तनात बदल जाणवल्याने पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने संपूर्ण घटना सांगितली. पालकांनी तत्काळ दवनीवाडा पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी 47 वर्षीय आरोपी मुख्याध्यापक ओमप्रकाश पटले याला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ahilyanagar Crime: एक लग्न होऊनही नर्तिका दिपाली पाटीलच्या मागे लागला, पत्नी नगरपरिषदेत भाजपची उमेदवार, कोण आहे संदीप गायकवाड?

भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?