Buldhana News : मलकापूर शहरातील (Malakpur News) हनुमान नगर परिसरातून एका उच्चभ्रू परिवारातील तीन जण अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. मलकापूर शहरातील वसंत कुमार पटेल यांनी मलकापूर शहर पोलीस (Malakpur Police ) स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची पत्नी मित्तल पटेल, मुलगी सिया पटेल व मुलगा देवांश पटेल हे बाजारपेठेत गेले होते, मात्र बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने ते रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. मलकापूर शहरातील उच्चभ्रू परिवारातील तीन सदस्य अचानक बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून एकाच दिवसात पटेल परिवाराच्या सदस्यासह एकूण सात जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांना विविध पोलीस स्थानकात प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील व्यक्तींच अचानक बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
Buldhana Accident News : भरधाव कार आणि रिक्षाचा भीषण अपघात; दोन मजूर महिलांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार ते किनगाव जट्टू मार्गावर भरधाव कारने समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील दोन मजूर महिलांचा मृत्यू झालाय. तर सात महिला गंभीर जखमी असून यातील तीन महिलांचे प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षाचा चुराडा झाला असून रिक्षातील महिला अपघातानंतर दूरवर फेकल्या गेल्याने यातील अनेकांना गंभीर इजा झाली आहे. तर दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी महिलांवर लोणार व मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्रयाभीषणअपघातमुळेपरिसरातएकचखळबळउडालीआहे.
Hingoli : विस्तीग्रहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात किडे अन् अळ्या, सामाजिक न्याय विभागाच्या कळमनुरी येथील वस्तीगृहातील प्रकार
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वस्तीगृहामध्ये राहणे आणि जेवणासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु याच वस्तीगृहामध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये किडे आणि अळ्या आढळून आलेल्या आहेत. हा अत्यंत कीळसवाणा प्रकार विद्यार्थ्यांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये इतका गाफीलपणा संबंधित वस्तीगृह प्रशासन करत असून याचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थी वस्तीगृहातील स्वयंपाकी कर्मचाऱ्याकडे गेले असता त्यांच्याकडून सुद्धा उद्धट उत्तरे मिळत आहेत. चांगलं जेवण करून देतो, तुम्ही थोडे थोडे जेवण करा, जर तुम्हाला पोटभर जेवण पाहिजे असेल तर तुमच्या भाजीत पाणी टाकून देतो, अशी अतिशय उर्मट भाषा संबंधित स्वयंपाकी कर्मचाऱ्याने केली असून विद्यार्थ्यांना बेचव आणि किडे अळ्या असलेलं जेवण करावे लागत आहे. त्यामुळे संबंधित जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा
