Buldhana Crime News : बुलढाणाजिल्ह्यातूनएकअतिशयखळबळजनकबातमीसमोरआलीआहे. चिखली तालुक्यातील सोमठाणा (Somthana) येथे धक्कादायक असं तिहेरी हत्याकांड (Buldhana Crime News) घडले आहे. यात जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची हत्या करून आरोपी दीपक फत्तेसिंह सुरडकर फरार झाला आहे. या हत्याकांडात (Crime News)आई सरस्वती फतेसिंग सुरडकर, (वय 70 वर्षे), भाऊ संजय फत्तेसिंह सुरडकर, (वय 55 वर्षे), आणि पुतण्या रणजीत संजय सुरडकर, (वय 25 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यानयाघटनेतीलआरोपीफरारझालाअसूनत्याचापोलीस (Buldhana Police) शोधघेतआहे. मात्रयाघटनेनंपरिसरातमोठीखळबळउडालीअसूनआरोपीचाशोधघेणंहेआता पोलिसांपुढंच आव्हानअसणारआहे. (Buldhana Crime News) 

Continues below advertisement

Buldhana Crime News : जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याचा बळीघेतला, आरोपीफरार

दरम्यान, जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याचा जीव घेणाऱ्या या घटनेने सोमठाणा हादरले आहे. एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या झाली असून, आरोपी दीपक सुरडकर घटनेनंतर फरार झाला आहे. 70 वर्षीय सरस्वती फतेसिंग सुरडकर, त्यांचा 55 वर्षीय मुलगा संजय फत्तेसिंह सुरडकर आणि 25 वर्षीय नातू रणजीत संजय सुरडकर हे या हत्याकांडाचे बळी ठरले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दीपकच्या हिश्यातली शेती आईने त्याच्या भावाच्या नावावर केल्याच्या रागातून हे हत्याकांड घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि घटनाक्रम पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. सध्या चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Continues below advertisement

Chandrapur News: सैनिक शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर असलेल्या खाजगी शिक्षण संस्थेच्या सन्मित्र सैनिक शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानेमोठीखळबळउडालीआहे. चंद्रपूर शहरालगत बल्लारपूर मार्गावर असलेल्या खाजगी शिक्षण संस्थेच्या सैनिक शाळेत इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. सन्मित्र सैनिक शाळा असे या शाळेचे नाव आहे. बारा वर्षाचा जीवन विलास झरेकर याच वर्षी शाळेत दाखल झाला होता. त्वचेवर पुरळ आल्याने गुरुवारी दुपारी त्याच्या वडिलांनी त्याला चंद्रपूर शहरातील एका त्वचारोग तज्ज्ञाकडे दाखविले. यानंतर जीवनला शाळेत सोडून वडील सुमारे 50 किमी दूर असलेल्या राजुरा तालुक्यातील खांबाडा या गावी पोचले. मात्र त्यांना शाळेतून शिक्षकांचा मोबाईल कॉल आला आणि त्यांनी तातडीने शाळेत येण्याचा निरोप दिला. परतीच्या वाटेवर असताना दुसरा कॉल आला यात त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले. सध्या विद्यार्थ्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात असून शोकमग्न पालकांना मात्र शाळा व्यवस्थापन, रुग्णालय आणि पोलीस यांच्या वतीने मृत्यूचे कारण सांगितले गेलेले नाही. या संशयास्पद मृत्यूचा पोलीस तपास करत आहेत.