Buldhana Crime News: देऊळगावराजा शहरातील राड्याप्रकरणी मोठी अपडेट; दोन गटातील हाणामारी प्रकरणी 20 जणांवर गुन्हे दाखल; पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारी (Crime News) प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील प्रत्येकी 18 ते 20 जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील दोन गटात झालेल्या सशस्त्र हाणामारी (Crime News) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी दोन्ही गटातील प्रत्येकी 18 ते 20 जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात दोन जणांचा मृत्यू (Buldhana Crime News) झाला होता, तर सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या गेटवरच संपूर्ण घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सध्या या प्रकरणी पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देऊळगाव राजा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देऊळगाव राजा शहरात ठाण मांडून असून सध्या देऊळगाव राजा शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Deulgaon Raja Crime News)
Deulgaon Raja Crime News: नेमकं प्रकरण काय?
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात सोमवारी रात्री एका समाजाच्या दोन गटात तुफान हाणामारीझाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत दोन्ही गटाकडून तलवारी आणि धारदार शास्त्रांचा वापर करण्यात आलाय. या संपूर्ण राड्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे देऊळगाव राजा पोलीस स्थानकाच्या गेट समोरच हा राडा झालाय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काल (5 ऑक्टोम्बर) रात्री देऊळगाव राजाशहरातील एका परिसरात कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात काही लहान मुलांमध्ये बसण्याच्या कारणावरून वाद झाला. दिवसभर या वादामुळे दोन्ही गटात तणाव निर्माण होऊन दोन्ही गट पोलीस स्टेशन समोरच समोरासमोर आले व तुफान हाणामारी झाली.
दरम्यान, या हाणामारीत शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक अन्वर शेख आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असलेले आरिफ पठाण यांचा मृत्यू झालाय. हे दोन्ही परस्पर विरोधी गटातील होते. या वादामागे काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? याचा शोधही पोलीस आता घेत आहेत. पोलिसांनी विविध कलमान्वये दोन्ही गटातील अनेक लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून देऊळगाव राजा शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या देऊळगाव राजा शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























