Buldhana Crime News: चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीला अत्यंत अमानुषपणे मारहाण करत संपवल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना बुलढाण्याच्या खामगाव (Khamgaon) शहरातील गोपालनगर (Gopal Nagar) परिसरात घडली आहे. बेसबॉल स्टिकने गंभीर मारहाण करून पतीने पत्नीचा जीव घेतला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) आरोपी पतीला बेड्या ठोकल्या (Arrested) आहेत.

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल नगर परिसरात राहणाऱ्या गणेश डाबेराव (Ganesh Daberao) याच्या घरातून गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक मोठ्याने आरडाओरड आणि भांडणाचा आवाज येऊ लागला. वादाचा आवाज ऐकून आजूबाजूला राहणारे स्थानिक नागरिक तात्काळ डाबेराव याच्या घरासमोर जमले. यावेळी जमलेल्या नागरिकांनी गणेश याला नक्की काय झाले याबाबत विचारणा केली.

Buldhana Crime News: 'माझ्या पत्नीचे कुणासोबत तरी लफडं, मी तिला संपवलं' 

तेव्हा आरोपी पतीने "माझ्या पत्नीचे कुणासोबत तरी लफडं आहे, त्यामुळे मी तिला संपवले," असे निर्लज्जपणे नागरिकांना सांगितले. हे ऐकून उपस्थितांच्या पायाखालची जमीन सरकली. नागरिकांनी प्रसंगावधान राखून तात्काळ या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण खामगाव शहरात आणि बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून कौटुंबिक हिंसाचाराचा हा प्रकार अत्यंत चिंताजनक मानला जात आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Continues below advertisement

Bhandara Crime News: भंडाऱ्यात पैशाच्या वादातून स्कार्पिओ पळवली, एका गाईला उडवले

दरम्यान, पैशांच्या वादातून संतापलेल्या एका तरुणाने थेट स्कार्पिओ गाडी पळवून नेल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील सुकळी गावात घडली. गाडी थांबवण्यासाठी गावकरी आणि पोलिसांनी तब्बल 30 ते 35 किलोमीटरपर्यंत ‘सिनेस्टाईल’ पाठलाग केला. या थरारक घटनेत तीन पोलीस ठाण्यांची हद्द, सुमारे 50 हून अधिक दुचाकी आणि शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आरोपीने बेदरकारपणे स्कार्पिओ चालवत एका गाईला जोरदार धडक दिली, ज्यात गाईचा जागीच मृत्यू झाला. अनेक अडथळे ओलांडत आणि पोलिसांना हुलकावणी देत तो सुसाट पळत होता. अखेर मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव परिसरात पोलिसांनी आणि नागरिकांनी स्कार्पिओला चारी बाजूंनी घेरून चालकाला ताब्यात घेतलं. दिनेश राठोड (36), असे या तरुणाचे नाव असून तो मोहाडी तालुक्यातील वरठी येथील रहिवासी आहे. या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून स्कार्पिओ पळवण्यामागील पैशांचा वाद नेमका कोणासोबत होता, याचा तपास सुरू आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Mumbai Accident: मुंबईत भीषण अपघात, भरधाव कारने 20 जणांना उडवलं, महिला वकिलाचा जागीच मृत्यू