Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातूनएकअतिशयसंतापजनकआणितितकीचधक्कादायकबातमीसमोरआलीआहे. दुधलगाव परिसरात एका शेतात कामाला असलेले मध्य प्रदेशातील पती-पत्नी हे रात्रीच्या वेळेस झोपलेले असताना अचानक दोन इसम हातात शस्त्र घेऊन त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी पीडितेच्या पतीला आणि पीडितेला शस्त्राचा (Buldhana Crime News) धाक दाखवून 19 वर्षीय या विवाहित महिलेवर आळीपाळीने आणि बळजबरी ने बलात्कार (Crime News)केलाय.
शिवाय त्यांच्याकडे असलेले मोबाईल व काही रोख रक्कम घेऊन दोघे दुचाकीने फरार झाले.दरम्यान, याप्रकरणी 19 वर्षे विवाहित पीडीतेने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीच्या शोधासाठी पाच पथके रवाना केली आहेत. या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही अज्ञात आरोपी अद्याप फरार असल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. मात्रयाघटनेनंपरिसरातमोठीखळबळउडालीअसूननागरिकांमध्येभीतीचीलाटपसरलीआहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा परिसरात दोन उच्चशिक्षित विद्यार्थिनींची भररस्त्यात छेड काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या पोलिसावर संशयितांनी दारूच्या बाटल्या फेकल्याने परिस्थिती चिघळली. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होता.
Akola Crime : रेल्वेतील 'त्या' व्हिडिओ प्रकरणी तरुणीच्या बहिणीने मागितली तरुणाची जाहीर माफी.
दोन दिवसांपूर्वी अकोला–बडनेरा रेल्वेत एका तरुणीने छेडछाड केल्याचा आरोप करत तरुणाच्या हातात बांगडया भरून लाली लिपस्टिक लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होताय. गेल्या 3 दिवसांपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. मात्र, आता या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळालेय. संबंधित तरुणीच्या बहिणीने व्हिडिओद्वारे समोर येत त्या तरुणाची सोशल मीडियावर जाहीर माफी मागितलीये. परंतु, त्याने तिला हात लावत स्पर्श केल्याच्या गैरसमजातून ही घटना घडल्याचे तिने सांगितलेय. या नव्या घडामोडीनंतर संपूर्ण प्रकरणाची सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झालीये. आता या प्रकरणात पुढे नेमकं काय घडतं, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. दरम्यान, तिने अशा प्रकारे धडा शिकवणं चुकीचं होतं, त्याबद्दल तरुणाची जाहीर माफी मागते, असे व्हिडिओमधून तिच्या बहिणीने स्पष्ट केलेय. दरम्यान,तो तरुण कोण आहेय?, कुठला आहेय?, हॆ अद्याप समोर येऊ शकलं नाहीय.
इतरमहत्वाच्याबातम्या
