एक्स्प्लोर

Buldhana Crime News : एकनाथ शिंदेंनंतर भाजप आमदार श्वेता महालेंना जीवे मारण्याची धमकी; पत्रात आक्षेपार्ह भाषा, नेमकं कारण काय?

Buldhana Crime News : बुलढण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचं पत्र मिळालं आहे. 

Buldhana Crime News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी (Death Threat to Eknath Shinde) देणाऱ्या दोन आरोपींना बुलढाणा (Buldhana Crime) जिल्ह्यातील देऊळगावच्या मही येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई एटीएसने(ATS) ही कारवाई करत या आरोपींना ताब्यात घेऊन मुंबईकडे निघाले आहे. धमकीची हे प्रकरण ताजे असताना बुलढाणा जिल्ह्यातून पुन्हा एक असाच धमकी देत जीवे मारण्याचे पत्र पुढे आले आहे. बुलढण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचं पत्र मिळालं आहे. 

या धमकीच्या पत्राने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणी आमदार श्वेता महाले आज (21 फेब्रुवारी) दुपारी आपल्या समर्थकांसह चिखली पोलिसात तक्रार देणार असल्याची ही माहिती पुढे आली आहे. दरम्यान या पत्रात श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. मात्र हे पत्र नेमकं कोणी आणि का पाठवलं, याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचे प्रकरण ताजे असताना बुलढाणा जिल्ह्यातून असेच एक दुसरे प्रकरण पुढे आले आहे. 

एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी; दोघांना बेड्या    

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याच्या धमकी देणाऱ्या मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे अशा या दोन आरोपींना मुंबई एटीएसने(ATS) अटक केली आहे. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव मही येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. हे दोघेही संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे.  या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे आहेत. मंगेश हा नात्याने अभयचा मामा आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या धमकी मागेल नेमकं कारण काय? हे ही आता तपासानंतर कळू शकणार आहे. 

अशा फुकट धमक्यांना कधीही भीत नाही- एकनाथ शिंदे

दुसरीकडे या धमकी प्रकरणावर  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत अशा फुकट धमक्या खूप येत असतात. आमचे सरकार हे प्रचंड मजबूत आहे. गृहखातं मजबूत आहे. अशा बदमाशी करणाऱ्या ई-मेल ला शोधून काढतील. ज्यांनी धमकी दिली असेल आणि ते तपासात निष्पन्न होईल. त्यांना सोडले जाणार नाही. एकनाथ शिंदे यांना गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सुद्धा धमक्या आल्या होत्या. त्यामुळे अशा धमक्यांना मी भीत नसल्याची स्पष्टोक्ती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. 

हे ही वाचा 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलवर दिली धमकी, एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर
पुण्यात प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत; प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला संपवलं; आईला व्हिडिओ कॉलवर दिली धमकी, एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर
Beed Crime News: 'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
Beed Crime News: केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना
केवळ 1000 रुपयांचे शुल्क थकले, संतापलेल्या वसतीगृह चालकाकडून नववीतील विद्यार्थ्याला बेदम मारहाण; बीडमधील धक्कादायक घटना
Mumbai Crime News: मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...
मुंबई हादरली! जादूटोण्याच्या संशयावरून पतीनं बायकोला संपवलं; व्हिडिओ कॉल करून मुलाला दाखवला मृतदेह अन्...

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
मोठी बातमी! आता एकच कनेक्शन, पीएनजी गॅसधारकांना LPG गॅस सोडावा लागणार; केंद्राचा आदेश जारी
Dubai Live News: अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?
Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Embed widget