(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लव्ह, प्यार और धोका..! मी तुझ्याशी लग्न करणार, आश्वासन देऊन तरुणीवर सातत्यानं अत्याचार, आरोपी अटकेत
Bhiwandi Crime: 24 वर्षीय इवेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाऱ्या पीडित तरुणीच्या जीवनात लव्ह, प्यार आणि धोका या हिंदी चित्रपटासारखी घटना घडली आहे.
Crime News: भिवंडी : इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाऱ्या पीडित तरुणीच्या जीवनात लव्ह, प्यार आणि धोका या हिंदी चित्रपटासारखी घटना घडली आहे. 24 वर्षीय तरुणीला एका 22 वर्षांच्या तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून पीडितेवर वारंवार बलात्कार केला. तसेच, तिला ब्लॅकमेलही केलं. तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिला वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या धोकेबाज तरुणाला कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. कोनगाव पोलीस ठाण्यात आरोपीवर बलत्कारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. नुह रीहान मोमीन असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
24 वर्षीय इवेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करणाऱ्या पीडित तरुणीच्या जीवनात लव्ह, प्यार आणि धोका या हिंदी चित्रपटासारखी घटना घडली आहे. 22 वर्षीय तरुणासोबत इस्टांग्रामवर ओळख होऊन मैत्री झाली. त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून त्यानं पीडितेवर वारंवार बलात्कार करून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या फवसणाऱ्या कोनगाव पोलीस ठाण्यात बलत्कारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नुह रीहान मोमीन असं अटक करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन, त्यानंतर धोका; तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय पीडित तरुणी इवेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत असून ती कुटुंबासह उल्हासनगर कँम्प नंबर तीन भागात राहणारी आहे. तर आरोपी दगाबाज हा भिवंडी शहरातील बंगलापुरा भागात राहतो. त्यातच दोघांची इस्टांग्रामवर ओळख होऊन मैत्री झाली होती. यादरम्यान जानेवारी 2022 मध्ये एका ढाब्यावर इवेंट मॅनेजमेंटचे काम करताना दोघांमध्ये प्रेमाचे सूत जुळलं होत. याचा फायदा घेऊन आरोपी दगाबाजाने नोव्हेंबर 2023 रोजी बहाण्यानं पीडितेला एका हॉटेलमध्ये बोलवून लग्नाचं आमिष दाखून तिच्यावर बलात्कार केला.
दुसरीकडे महिन्याभरात म्हणजे, डिसेंबर 2024 मध्ये आरोपीनं नाशिकमध्ये राहणाऱ्या एका तरुणीशी साखरपुडा झाल्याची माहिती पीडितेला मिळाली होती. यामुळं पीडितेनं आरोपीकडे लग्नाबद्दल विचारलं, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे. माझ्या घरच्यांनी माझा साखरपुडा जबरदस्तीनं केलाय, असं बोलून त्यानं पीडितेला पुन्हा एकदा आश्वासन दिलं.
29 एप्रिल 2024 रोजी आरोपी पीडितेच्या घरी तिला भेटायला आला असता, तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र त्यावेळी त्यानं पीडितेला लग्नासाठी स्पष्ट नकार देऊन धमकी दिली. आपल्या दोघांचे अश्लील फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुला बदनाम करील, अशी धमकी आरोपीनं पीडितेला दिली. त्यानंतर आरोपीनं पीडितेला मारहाणही केली. तर पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीनं तिच्याकडून काही रक्कमही घेतली. तसेच तिचा गर्भपातही केल्याचा दावा पीडितेनं केला आहे.
दरम्यान, पीडितेच्या जीवनात घडलेल्या लव्ह , प्यार और धोका या घटनेनंतर पीडितेनं कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत पीडितेनं पोलिसांना माहिती दिली. पीडितेच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी नुरी हानवर भादंवि कलम 376 (2) (एन) 506 (2), 323 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
इन्स्टावर प्रेम फुललं, 5 मुलं आणि नवऱ्याला सोडून महिला प्रियकरासोबत फरार; पतीची पोलिसांत धाव