एक्स्प्लोर

Bhiwandi Crime News: भिवंडीत मौलवीने मुलाची बॉडी दुकानात पुरली, डोकं वर आल्यावर तुकडे करुन कचऱ्यात टाकलं, पाच वर्षे कोणाला पत्ताच लागला नाही

Crime News: शोएब गुमशुदगी प्रकरणाचा उलगडा; हत्या करून शवाचे तुकडे करून दुकानातच दफन केल्याचे उघड. मौलवी मशिदीत अजान देत असताना अल्पवयीन मुलांवर करत होता अत्याचार

Bhiwandi Murder News: मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या भिवंडीमध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. साडेचार वर्षांपूर्वी म्हणजेच 20 नोव्हेंबर 2020 रोजी अचानक बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय शोएब शेखच्या बेपत्ता होण्यामागचं रहस्य अखेर उलगडलं आहे. ठाणे क्राईम सेलने या प्रकरणात एक धक्कादायक कारवाई करत मौलवी गुलाम रब्बानी शेख याला अटक केली आहे. या मौलवीने शोएब शेखची (Shoaib Shaikh) निर्घृणपणे हत्या (Bhiwandi Murder News) केली होती आणि त्याचे शरीर छोटे-छोटे तुकडे करून काही कचऱ्यात फेकले होते. तर काही अवशेष स्वतःच्या किराणा दुकानात गाडून टाकले होते. ही घटना अक्षरशः एखाद्या थरारक चित्रपटात घडावी अशी असून अनेकांना अजय देवगणच्या ‘दृश्यम’ (drishyam movie) चित्रपटाची आठवण करून देणारी आहे. (Thane Crime News)

शोएब शेख हा भिवंडीच्या नवी बस्ती, नेहरू नगर भागात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. घरात एकुलता एक मुलगा असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे प्रेम त्याच्यावर होते. 20 नोव्हेंबर 2020 रोजी तो अचानक बेपत्ता झाला. त्याच्या अपहरणाची तक्रार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने पोलिसांनाही शोधकार्य करण्यात अपयश येत होते. 

गुलाम रब्बानी शेख हा नेहरू नगरमधील एका मशिदीत अजान देण्याचा  काम करत होता, त्याचबरोबर तो बाबागिरी करायचा आणि किराणा दुकानही चालवत होता. त्याच्या दुकानात एका अल्पवयीन मुलाला देखील कामावर ठेवले होते. पण याच दुकानात तो अल्पवयीन मुलांसोबत दुष्कृत्य करत असल्याची माहिती पुढे आली. हे कुकर्म शोएबने पाहिले होते आणि तो हा प्रकार सर्वांना सांगेल या भीतीने मौलवीने त्याला गप्प राहण्यासाठी सांगितले होते. त्याबद्दल मौलवी शोएबला पैसे देत होता.  परंतु काही दिवसांनी शोएब शेखची मागणी वाढत  त्याने दुकानातून सामान घेऊन पैसे देणंही बंद केलं होतं आणि नंतर मौलवीकडून पैसे उकळायला सुरुवात केली होती. याला कंटाळून मौलवीने एक दिवस शोएबला दुकानात बोलावून त्याचा गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह दुकानातच गाडून टाकले. 

आठ महिन्यांनंतर जेव्हा गाडलेल्या शवाचा काही भाग जमिनीवरून बाहेर यायला लागला, तेव्हा मौलवीने त्याचे छोटे छोटे तुकडे करून, दुकानात काम करणाऱ्या दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या हातून ते कचऱ्यात टाकून दिले. त्यानंतर उरलेले शव पुन्हा गाडून वर टाईल्स बसवल्या.या संपूर्ण प्रकरणात मौलवीन शोएबच्या कुटुंबाला खोटी आश्वासने देत राहिला. कधी अजमेर शरीफच्या नियाजचा सल्ला, कधी बकऱ्याची बली – या सगळ्या उपायांमधून तो कुटुंबाला फसवत राहिला. दोन वर्षे हा प्रकार चालू होता. 2023 मध्ये अचानक शोएबच्या आईला कोणीतरी सांगितलं की तिच्या मुलाचा खून अजान देणाऱ्या मौलवीनेच केला आहे . त्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.

पोलिसांनी फरार झालेल्या मौलवीला कसं शोधलं?

चौकशी सुरु असताना मौलवी गुलाम रब्बानी शेख हा गर्दीचा फायदा घेत पोलीस ठाण्यातून फरार झाला होता. या मौलवीने ज्या अल्पवयीन मुलांवर अत्याचार केले होते त्या अल्पवयीन मुलाने देखील 2023 मध्ये  या मौलवी विरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. फरार झालेल्या मौलवीने दिल्लीमार्गे उत्तराखंडच्या रुडकी जिल्ह्यात गेला आणि तिथे ओळख बदलून एका मशिदीत पुन्हा मौलवी म्हणून काम करू लागला. उत्तराखंडमध्ये एका वादात त्याने "मी कित्येकांना कापून गाडलं आहे" असं धमकीवजा विधान केलं, आणि त्याच्या माहितीचा शोध घेतल्यावर समोर आलं की तो भिवंडीचा वॉन्टेड आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ठाणे क्राईम प्रॉपर्टी सेलच्या टीमने मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे उत्तराखंडमध्ये पोहोचून मौलवी गुलाम रब्बानी याला अटक केली.

आरोपीने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्या दुकानात शव गाडल्याचेही मान्य केले. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने त्या दुकानात खोदकाम केल्यानंतर शोएबच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. सध्या ठाणे क्राईम प्रॉपर्टी सेल या खून आणि अपहरण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. शोएबच्या कुटुंबाने हत्यार्‍याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. शोएबच्या आईने रडत सांगितले की, "माझा मुलगा खूपच निरागस होता. त्याचा इतक्या क्रूरपणे खून करणारा आमच्याच शेजारी राहात होता हे आम्हाला कधीच कळलं नाही. आज तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी."अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. 

आणखी वाचा

पतीची अमानवी विकृती, पत्नीने पोटगी मागितली म्हणून गुप्तांगात हळद-कुंकू भरलं, लिंबू पिळलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget