एक्स्प्लोर

Bhiwandi Crime News : खळबळजनक! भिवंडीत 22 वर्षीय तरुणीवर आळीपाळीने सामूहिक अत्याचार; सहा आरोपींना 48 तासांत बेड्या

Bhiwandi Crime News : भिवंडी शहरात एका 22 वर्षीय तरुणीवर झालेल्या धक्कादायक सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत 48 तासांच्या आत सहा आरोपींना अटक केली आहे.

Bhiwandi Crime News : भिवंडी शहरात एका 22 वर्षीय तरुणीवर झालेल्या धक्कादायक सामूहिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी जलद कारवाई करत 48 तासांच्या आत सहा आरोपींना अटक केली आहे. ही घटना बागे फिरदोस परिसरात घडली. जिथे पीडित तरुणीला तिच्या भावासह जबरदस्तीने पळवून नेण्यात आले. आरोपींनी पीडितेच्या भावास आणि रिक्षा चालकास मारहाण (Crime News) करून तिला नागाव परिसरातील निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. त्यानंतर आरोपींनी तिला फातिमा नगर भागातील एका पिकअप बोलेरो गाडीत नेऊन पुन्हा अत्याचार केले. याप्रकरणी प्रथम तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर तो शांतीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

शहरात संतापाची लाट, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये चिंता

दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपास हाती घेत 48 तासांच्या आत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करत असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपींना 27 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाने शहरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

अल्पवयीन मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार, आरोपी मोकाट

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शेलापुर या गावात एका अल्पवयीन मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन चार दिवस उलटले असताना अद्याप आरोपी मोकाटच असल्याचे पुढे आले आहे. दरम्यान आरोपीला अटक न केल्याने गावातील शेकडो महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अद्याप मोकाट असून या आरोपीचे नातेवाईक हे पीडीतेला व तिच्या पालकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचे  या निवेदनात म्हटले आहे. यावेळी पोलीस अधीक्षकांना आंदोलकांची मागणी लक्ष्यात घेत अधिक जलद गतीने तपास करण्याचे आश्वासन दिलं आहे. मात्र यावेळी आक्रमक महिलांनी बुलढाणा पोलिसांचा ही निषेध नोंदवला व आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
शेतात सोन्याचे सात हांडे पुरल्याची बतावणी; जालन्यात मांत्रिकासह नऊ जणांना अटक, अघोरी पुजेचं साहित्यही जप्त
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Kaziranga Accident : मोठी बातमी, आसामच्या काझीरंगामध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
आसामच्या काझीरंगामध्ये भीषण अपघात, ट्र्क-बसच्या अपघातात 23 जणांचा मृत्यू,मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ, दूध दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ; संघाच्या बैठकीत निर्णय, महागाईचं दिलं कारण
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
राहुल गांधींचा फोन टॅप हा आरोप नाही, वस्तुस्थिती; हर्षवर्धन सपकाळांची टीका, संजय राऊतांचाही मोदी-शाहांवर हल्लाबोल
Embed widget