एक्स्प्लोर

Bhigwan Kidnapping Case: भिगवणमधील अपहरण झालेली तरुणी मध्यरात्री 1.30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये धडकली, नेमकं काय घडलेलं, सगळं सांगितलं!

Bhigwan Kidnapping Case: इंदापूर तालुक्यातील भिगवन प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली आहे.

Bhigwan Kidnapping Case: इंदापूर तालुक्यातील भिगवनमध्ये आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण (Bhigwan Kidnapping Case) झाल्याची घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र संबंधित तरुणीने व्हिडीओ शेअर करत जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे स्पष्ट केले. मात्र संबंधित तरुणी नेमकी कुठे आहे, तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे सहा पथक रवाना झाले होते. परंतु तरुणीचा शोध कुठेही लागला नव्हता. त्यानंतर काल मध्यरात्री भिगवन प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली.

मुलीने नोंदवला जबाब- (Bhigwan Kidnapping Case Marathi News)

इंदापूर तालुक्यातील भिगवन प्रकरणातील अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली आहे. मुलगी स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब मुलीने पोलिसांना दिला आहे. तसेच नेमकं काय घडलेलं, याबाबतही तरुणीने माहिती दिली आहे. पोलीस साडेपाच वाजता मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेले आहेत. मुलाला कुठे घेऊन गेले हे पोलीस सांगत नाहीत. मुलगी शहर पोलीस ठाण्यामध्ये आहे. पोलीस या प्रकरणाबाबत कमालीची गुप्तता पाळत आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीने व्हिडीओही केला होता प्रसिद्ध- (Bhigwan Kidnapping Case)

अपहरण झालेली तरुणी आणि तरुणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तिने म्हटलंय की, जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे तरुणीने सांगितले आहे. आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचा खुलासा या तरुणीने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. मी जहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षांपासून प्रेमसंबंधात आहे. कालच्या प्रकरणात माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केली नाहीये. मी माझ्या इच्छेने आली असल्याचे तरुणी या व्हिडिओमध्ये सांगताना दिसते आहे.

आतापर्यंत या प्रकरणात काय झालं? (Bhigwan Kidnapping Case)

- 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलं.
- रात्री मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला होता.
- पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवन बंदची हाक देण्यात आली.
- रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला.
- अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजा शेजारी आहे.
- दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं असे कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेत.
- व्हॉट्सअॅप माध्यमातून काय बोलणं झालं हे पोलीस काढत आहेत.
- मुलीचे वय 21 वर्ष आहे.
- अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नाही.
- अपहरण झालेल्या मुलीचे 22 तारखेला लग्न आहे.
- आई, भाऊ आणि ती लग्नाच्या खरेदीवरून घरी जात असताना अपहरण करण्यात आलं आहे. 
- आरोपी आणि अपहरण झालेली मुलगी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.
- शोधासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत.
- पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.
- यामध्ये कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.
- कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
- जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
- पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
-अपहरण झालेली तरुणी 21 फेब्रुवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली. 
-मुलगी स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब तरुणीने पोलिसांना दिला आहे.

संबंधित बातमी:

Chhatrapati Sambhajinagar Crime News: मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळून आई-वडील गावी निघाले; पोलिसांनी अडवताच बिंग फुटलं, छत्रपती संभाजीनगरमधील हादरवणारी घटना

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Embed widget