दरम्यान, हे सर्व 11 तरुण जवळच सुरू असलेल्या एका लग्नाच्या मंडपातून या ठिकाणी आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, ते नेमके कशासाठी या बांधकामस्थळी गेले होते, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून सध्या पाहणी आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बांधकामातील सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Crime News : टिटवाळा ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट, पोलीसतपासातधक्कादायकमाहितीसमोर
टिटवाळा ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट समोरआलीआहे. यातील अश्विनी पॉलचा लिव्ह इन पार्टनर आमिर सय्यदने तब्बल 25000 एक्स्टसी गोळ्यांची तस्करी केल्याच तपासात समोर आलंआहे. या सगळ्या एक्स्टस गोळ्या त्याने परदेशातून तस्करी केल्याचा अमली पदार्थ विरोधी कक्षाला संशय असूनत्यादिशेनेआतातपासकेलाजातआहे. यातील 5030 एक्स्टसी गोळ्यांसह अश्विनी पॉलला अटक करण्यापूर्वी त्याने 20,000 गोळ्या विकल्याच समोर आलंआहे. तर उर्वरित ड्रग्स विकण्यापूर्वीच आमिर सय्यदाला अटक झाली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमिर सय्यदचा अमली पदार्थ विरोधी पथकाने ताबा घेतला असून ड्रग्स नेमकं कुठून आणलं आणि ते कोणा कोणाला विकलं? याचा अमली पदार्थ विरोधी कक्षाकडून तपास सुरू आहे
इतर महत्वाच्या बातम्या
