Bhandara News Update : प्रेम प्रकरणातून धारदार शस्त्राने वार करुन एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसाद समोर घडली आहे. खुनाचा हा थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सचिन गजानन मस्के ( वय, 34 रा. शिवाजी नगर तुमसर ) असे मृत तरूणाचे नाव आहे. या घटनेत तीन आरोपींचा समावेश असून दोघांना पोलिकांनी अटक केली आहे. परंतु, मुख्य  आरोपी अद्याप फरार आहे. कुलदीप मनोहर लोखंडे (वय 27) आणि चेतन दिलीप मदारकर (वय 28 दोघेही रा. शिवाजी नगर तुमसर ) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे असून रंजीत सहदेव  गभने (वय 32 वर्ष रा. शिवाजी नगर, तुमसर ) हा अद्याप फरार आहे. 

Continues below advertisement

भंडारारा जिल्ह्यातील तुमसर शहरामधील देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसादमध्ये सचिनसह तीन ते चार जण जेवन करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी गेले होते. जेवन आटोपून हे सर्व हॉटेलच्या बाहेर आले. त्यावेळी जून्या प्रेम प्रकरणातून तेथे वाद झाला. या वादानंतर सचिन आपल्या दोन मित्रांसोबत दुचाकीवरून निघाला असता त्याची गाडी थांबत आरोपी रंजीत गभने याने सचिनच्या  पाठीवर आणि पोटावर धारधार हत्याराने सपासप वार केले. त्यात सचिन जागीच ठार झाला. सचिन मृत्युमुखी पडल्याची खातरजमा होताच सर्व आरोपींनी तेथून पळ काढला. 

घटना सीसीटीव्हीत कैददरम्यान, या खुनाच्या घटनेचा थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जे दोघे जण सचिन याच्या गाडीवर वसून आले होते. ते त्याचा खून झाल्यानंतर मुख्य आरोपी रंजीत याच्या गाडीवर बसून घटनास्थळावरून पळून गेले. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजवरून तुमसर पोलिसांनी दोन आरोपींला अटक केली असून मुख्य आरोपी फरार आहे. प्रेम प्रकरणामुळे सचिनला संपविण्याचा कट आरोपींनी आधीपासूनच आखल्याची माहिती पुढे येत आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध सुरू असून तुमसर पोलीस  पुढील तपास करीत आहेत. 

Continues below advertisement