एक्स्प्लोर

Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!

Bhandara Crime News : भंडाऱ्याच्या मडेघाटमध्ये वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्यावा, या मागणीला घेऊन जावयानं सासऱ्यासोबत वाद घालून त्यांच्यावर चाकूनं प्राणघातक हल्ला केलाय.

Bhandara Crime News : भंडाऱ्याच्या मडेघाट येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्यावा, या मागणीला घेऊन जावयानं सासऱ्यासोबत वाद घालून त्यांच्यावर चाकूनं प्राणघातक हल्ला (Bhandara Crime News)  केलाय. या हल्ल्यात 47 वर्षीय सासरे दीपचंद ढोरे हे गंभीर जखमी (Crime News) झाले आहेत. त्यांच्यावर लाखांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आला. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना भंडारा मेडिकल कॉलेजला रेफर करण्यात आलं आहे. लाखांदूर पोलिसांनी राहुल राऊत (34) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास सध्या करत आहे.

तर दुसरीकडे भंडाऱ्यात शासकीय धान गोडाऊनमधील तांदळाची चोरी झाल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी पवनी पोलिसांनी तपास करत या प्रकरणाचा छडा लावला आहे. तसेच धान व्यापाऱ्यासह 5 आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

Bhandara Crime News : शासकीय गोडाऊनमधून तांदूळ चोरी, धान व्यापाऱ्यासह 5 जणांना अटक 

शासकीय गोडाऊनमधून तांदूळ चोरी केल्याचं प्रकरण भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील आमगाव इथं उघडकीस आले होते. याप्रकरणी पवनी पोलिसांनी एका धान व्यापाऱ्यासह 5 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात भंडाऱ्याच्या साकोली येथील धान गोडाऊन मधून 361 कट्टे तांदूळ चोरी झाल्याच्या प्रकरणी 11 जणांना अटक केली आहे. त्यानंतर आता पवनी तालुक्यातील आमगाव इथलं हे प्रकरण उघडकीस आल्यानं प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पवनी पोलिसांनी चोरी केलेले 72 धान तांदूळ कट्टे पिकअप वाहनासह ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये धान व्यापारी नंदकिशोर कावळे (43), मोहित वाघमारे (20), रुपेश शेंडे (38), विलास शेंडे (33), वैभव मुंडले (23) यांचा समावेश आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आणखी तांदूळ चोरी झाली आहे का? किंवा चोरीच्या प्रकरणात आणखी मोठ्या प्रमाणात आरोपींचा सहमावेश आहे का? या दृष्टीनं आता पवनी पोलीस तपास करीत आहे.

Bhandara Accident News : स्विफ्ट डिझायरच्या अपघातीतील जखमी एकाचा मृत्यू, तर दुसऱ्यावर नागपुरात उपचार

राष्ट्रीय महामार्गावरील बेला इथं परवा रात्री पाठीमागून आलेल्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारं नं दुचाकीला भीषण धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवरील दोघं गंभीर जखमी झाले होते. दोघांवरही नागपूर येथे उपचार सुरू असताना गंभीर जखमी झालेल्या करण मलेवार या २० वर्षीय तरुणाचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, राहुल गभणे (२४) हा गंभीर असून त्याच्यावर नागपुरात उपचार सुरू आहे. भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचं काम अगदी संथगतीनं सुरू आहे. महामार्गावरील बेला गावाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर नाल्याचं काम सुरू आहे आणि तिथं खड्डा पडला असून तिथून जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या स्विफ्ट डिझायर कार नं भीषण धडक दिली होती. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Judge Shocking Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी गेलेल्या वसईतील न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू; सांगलीतील देशिंग गावावर शोककळा
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget