Bhandara Crime: महिला ग्रामपंचायत सदस्यासह तिच्या पतीला चौघांकडून बेदम मारहाण; ॲट्रॉसिटी अंतर्गत चौघांविरोधात गुन्हा दाखल
Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात महिला ग्रामपंचायत सदस्यासह तिच्या पतीला चौघांकडून बेदम मारहाण (Crime News) करण्यात आली आहे.

Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात महिला ग्रामपंचायत सदस्यासह तिच्या पतीला चौघांकडून बेदम मारहाण (Crime News) करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या (Bhandara Crime) लाखांदूर तालुक्यात हि घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर या प्रकरणी दिघोरी मोठी पोलिसात ॲट्रॉसिटी अंतर्गत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhandara Crime : महिला सदस्य आणि तिच्या पतीला लाथाबुक्क्या, विटांनी बेदम मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, गावात सुरू असलेल्या आरो प्लांटच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत ग्रामपंचायतच्या महिला सदस्य तिच्या पतीसह काम सुरू असलेल्या ठिकाणी चौकशीसाठी गेल्या होत्या. यावेळी महिला सरपंच आणि बांधकाम करणाऱ्या ठेकेदारासोबत वाद निर्माण झाला. यानंतर महिला सरपंचाच्या पतीसह चौघांनी महिला सदस्य आणि तिच्या पतीला लाथाबुक्क्या आणि विटांनी बेदम मारहाण केली. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खोलमारा गावात घडली. रजनी टेंभुर्णे (31) असं महिला सदस्याचं आणि तिचा पती दिनेश टेंभुर्णे (44) असं पती पत्नीचं नावं आहे. तर, श्रीराम नागरिकर (38), डकराम नागरिकर (35), चरणदास नागरिकर (60), सुखराम नागरिकर (44) या चौघांचा मारहाण करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. ही घटना 19 ऑक्टोंबरची असून या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Bhandara Crime News : ॲट्रॉसिटी अंतर्गत चौघांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी दिघोरी मोठी पोलिसात दोन्ही बाजूनं परस्पर विरोधी तक्रारी दाखल केली आहे. महिला सदस्य रजनी टेंभुर्णे यांच्या तक्रारीवरून चौघांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, दुसऱ्या बाजूने श्रीराम नागरिकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून महिला सदस्यसह तिच्या पतीविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिघोरी मोठी पोलिसांनी परस्परांविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरण सध्या चौकशीत आहे. पवनीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम तपास करीत आहे.
Pune : EV बाईकच्या शोरूमला भीषण आग; जवळपास 50 ते 60 दुचाकी वाहन जळून खाक
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील EV बाईकच्या एका शोरूम ला आज पहाटे भीषण आग लागली आहे. या आगीत जवळपास 50 ते 60 दुचाकी वाहन पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. सकाळी पाच वाजता दरम्यान EV बाईकच्या शोरूम ला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली त्यानंतर अग्निशमन दल लगेच घटनांसाठी दाखल होऊन आग आटोक्यात आणली आहे. शॉर्टसर्किटमुळे शोरूम ला आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























