Bhandara Crime News : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या डॉक्टरला देवदूत मानलं जातं, त्याच डॉक्टरने एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोंदियातील (Gondia) मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह 5 जणांवर गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसांचे बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता, संबंधित महिलेने बाळाला घेऊन पळ काढल्याने संशय बळावला. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत बाळाला ताब्यात घेतले आणि तपासाचे धागेदोरे थेट गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलपर्यंत पोहोचले.

Continues below advertisement

Bhandara Crime News : बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात

दरम्यान, तपासात समोर आले की, 3 लाखांपैकी 1 लाख रुपये रोख आणि 1 लाखाचा धनादेश डॉक्टरच्या मध्यस्थी असलेल्या महिलेच्या खात्यात जमा झाला होता. उर्वरित 1 लाख रुपये 5 फेब्रुवारीला दिले जाणार होते. या घटनेने संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली असून, गरिबीचा फायदा घेऊन अशा प्रकारे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतले आहेत, याचा तपास आता भंडारा पोलीस करत आहेत.

Continues below advertisement

Bhandara Crime : एका महिलेला अटक, मुख्य सूत्रधार आणि इतर 3 आरोपी फरार

मिळालेल्यामाहितीनुसार, गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये एका दाम्पत्यानं आपल्या 10 दिवसांच्या मुलीला उपचारासाठी दाखल केले होते. डॉ. नितेश बाजपेयी याने उपचाराचा खर्च खूप जास्त होईल, अशी भीती पालकांना घातली. दरम्यान, नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत आम्ही मुलीवर मोफत उपचार करू, अशी खोटी बतावणी करून डॉक्टरने पालकांकडून मुलीला आपल्या ताब्यात घेतले. मात्र, उपचाराऐवजी या डॉक्टरने भंडाऱ्याच्या पांढराबोडी येथील एका महिलेला या चिमुकलीची 3 लाख रुपयांत विक्री केली. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी आणि इतर 3 आरोपी फरार आहेत. भंडारा पोलिसांची पथके फरार डॉक्टरच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. मात्रयाघटनेनेजिल्ह्यासहविदर्भातखळबळउडालीआहे.

Crime : यांच्यावर आहेत दाखल गुन्हे 

१) डॉ नितेश बाजपेयी - गोंदिया

२) मालती वाघमारे - पांढराबोडी भंडारा

३) पौर्णिमा धुर्वे - गोंदिया

४) ललेश्वरी सादेपाच - गोंदिया

५) उमेशसिंग गहलोत - गोंदिया

या पाच पैकी ललेश्वरी सादेपाच हिला पोलिसांनी अटक केली आहे.

ही बातमी वाचा: