एक्स्प्लोर

Bhandara Crime : खळबळजनक! उपचाराच्या नावाखाली 10 दिवसांच्या बालिकेची तीन लाखांत विक्री; मुख्य सूत्रधार गोंदियाचा डॉक्टर फरार

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. डॉक्टरने एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Bhandara Crime News : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला हादरवून टाकणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. ज्या डॉक्टरला देवदूत मानलं जातं, त्याच डॉक्टरने एका 10 दिवसांच्या चिमुकलीला चक्क 3 लाख रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोंदियातील (Gondia) मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह 5 जणांवर गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला असून, एका महिलेला अटक करण्यात आली आहे. भंडाऱ्याच्या महिला व बालविकास विभागाला पांढराबोडी गावात एका महिलेकडे 10 दिवसांचे बाळ असल्याची गोपनीय माहिती मिळाली. अधिकारी चौकशीसाठी पोहोचले असता, संबंधित महिलेने बाळाला घेऊन पळ काढल्याने संशय बळावला. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत बाळाला ताब्यात घेतले आणि तपासाचे धागेदोरे थेट गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलपर्यंत पोहोचले.

Bhandara Crime News : बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात

दरम्यान, तपासात समोर आले की, 3 लाखांपैकी 1 लाख रुपये रोख आणि 1 लाखाचा धनादेश डॉक्टरच्या मध्यस्थी असलेल्या महिलेच्या खात्यात जमा झाला होता. उर्वरित 1 लाख रुपये 5 फेब्रुवारीला दिले जाणार होते. या घटनेने संपूर्ण विदर्भात खळबळ उडाली असून, गरिबीचा फायदा घेऊन अशा प्रकारे रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचे हात गुंतले आहेत, याचा तपास आता भंडारा पोलीस करत आहेत.

Bhandara Crime : एका महिलेला अटक, मुख्य सूत्रधार आणि इतर 3 आरोपी फरार

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाच्या बालाजी हॉस्पिटलमध्ये एका दाम्पत्यानं आपल्या 10 दिवसांच्या मुलीला उपचारासाठी दाखल केले होते. डॉ. नितेश बाजपेयी याने उपचाराचा खर्च खूप जास्त होईल, अशी भीती पालकांना घातली. दरम्यान, नागपूरच्या एका स्वयंसेवी संस्थेमार्फत आम्ही मुलीवर मोफत उपचार करू, अशी खोटी बतावणी करून डॉक्टरने पालकांकडून मुलीला आपल्या ताब्यात घेतले. मात्र, उपचाराऐवजी या डॉक्टरने भंडाऱ्याच्या पांढराबोडी येथील एका महिलेला या चिमुकलीची 3 लाख रुपयांत विक्री केली. या प्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी आणि इतर 3 आरोपी फरार आहेत. भंडारा पोलिसांची पथके फरार डॉक्टरच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. मात्र या घटनेने जिल्ह्यासह विदर्भात खळबळ उडाली आहे.

Crime : यांच्यावर आहेत दाखल गुन्हे 

१) डॉ नितेश बाजपेयी - गोंदिया

२) मालती वाघमारे - पांढराबोडी भंडारा

३) पौर्णिमा धुर्वे - गोंदिया

४) ललेश्वरी सादेपाच - गोंदिया

५) उमेशसिंग गहलोत - गोंदिया

या पाच पैकी ललेश्वरी सादेपाच हिला पोलिसांनी अटक केली आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
Baramati Accident News: काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Pune Porsche Accident : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
Beed News : बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget