Bengaluru Crime : बंगळुरू : एका धक्कादायक घटनेनं देश पुरता हादरुन गेला आहे. बंगळुरू येथील हत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका तरुणाची कुऱ्हाडीनं वार करून हत्या करण्यात आली. रामकृष्ण असं मृत व्यक्तीचं नाव असून  तो विमानतळावर ट्रॉली ऑपरेटर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच, आरोपी रमेश याला घटनास्थळावरून अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.


विमातळावर कुऱ्हाडीनं वार करुन तरुणाची हत्या 


बंगळुरू विमानतळावरील घटनेनंतर एकच खळबळ उडाली. डीसीपी नॉर्थ ईस्ट यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, आरोपी रमेशनं बॅगमध्ये धारदार शस्त्र ठेवली होती. बीएमटीसी बसनं आरोपी विमानतळावर पोहोचला. आरोपीची बॅग स्कॅन झाली नाही, कारण तो बसमध्ये होता. यानंतर संधी साधून त्यानं रामकृष्ण यांच्यावर निर्घृण हल्ला केला. टर्मिनल 1 (लेन 1) येथील अरायव्हल्स पार्किंग एरियातील शौचालयाजवळ आरोपीनं रामकृष्ण यांची केली.


रामकृष्ण यांच्यावर आरोपीनं कुऱ्हाडीनं सपासप वार केले. सूत्रांच्या माहितीनुसार, विवाहबाह्य संबंधांतून ही हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आरोपीच्या पत्नीचे मृत रामकृष्णसोबत प्रेमसंबंध होते, असं सांगितलं जात आहे. यामुळे त्यानं ही घटना घडवून आणल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास सुरू असल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मिळत आहे. 


दरम्यान, कुऱ्हाडीनं सपासप वार करत आरोपीनं रामकृष्ण यांना यमसदनी धाडलं. त्यानंतर बंगळुरू विमानतळावर भितीचं वातावरण पसरलं होतं. विमानतळावर उपस्थित असलेले प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ पसरली होती. विमानतळावरील सुरक्षा भेदून आरोपी हत्यार घेऊन थेट आत घुसला आणि त्यानं एका विमानतळावरील कर्मचाऱ्याचा निर्घुण खून देखील केला, त्यामुळे विमानतळावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bhiwandi Crime : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत