Belgaum Crime News : प्रेमालानारंगाचं, नाजातीचंनाहीकुठल्याधर्माचंबंधनअसतं. मनजुळलीकिकेवळविश्वासावरनाती फुलतातआणिआयुष्यभरासाठी दोन मनएकत्रयेतात. मात्रसगळ्यांच्याबाबतीतहाअनुभवयेतोचअसेहीनाही. आजहीसमाजात जातीबाहेर लग्न करणं आजही बहुतांश ठिकाणी मान्य केलं जात नाही. परिणामी त्यातूनही कोणी तसं केलंच तरकाहीठिकाणीते स्वीकारलंही जातं. पणकाहीठिकाणीयालग्नालाकितीटोकाचाविरोधहोऊशकतो, अशाअनकेघटनाहीघडल्याचेउदाहरणआहे. त्यातूनचकाही वर्षांपूर्वी नागराज मंजुळेच्या 'सैराट' या चित्रपटात हीचकथामांडतसमाजाचंएकभीषणवास्तवहीमांडण्यातआलंहोतं. दरम्यान, याच चित्रपटाचीपुनरावृत्ती बेळगाव (Belgaum Crime News) जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यामध्ये घडलीआहे. याघटनेनंसंपूर्णजिल्ह्यातखळबळउडालीआहे.

Belgaum Crime : अन्य जातीतील प्रियकरासोबत पळून गेल्यानंसंतापलेल्याभावानं बहिणीला संपवलं

अन्य जातीतील प्रियकरासोबत पळून गेल्यानंसंतापलेल्याभावानं बहिणीलासंपवल्याचीघटनाघडलीआहे. सत्यव्वा संतोष हेळवी असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तरयातमारेकरीभावाने काका आणि भाऊजीच्या मदतीने सख्या बहिणीला विष पाजून संपवलं. त्यांनतरसांगली जिल्ह्यातील आरग येथे मृतदेहाचे परस्पर दहन देखीलकरण्यातआलेआहे. प्राथमिकमाहितीनुसार, लग्नानंतर देखील इतर जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची नातेवाईकांना चीड आल्याच्यारागातूनहेकृत्यकेल्याचीमाहितीआहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचाअधिकतपासकरतआहे. मात्रयाघटनेनंपरिसरातमोठीखळबळउडालाआहे.

Pune Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, नराधमाला अटक

काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 47 वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या 28 वर्षीय आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.