Belgaum Accident News : बेळगावातील नानावाडी येथेएकअतिशयधक्कादायकघटनाघडलीआहे. यात स्विमिंग पुलमध्ये (Swimming Pool) पोहत असताना लष्करी अधिकाऱ्याचा हृदयघाताने (Heart Attack) मृत्यू झाल्याची घटना घडलीआहे. बेळगावातील नानावाडी (Belgaum Accident) येथील कमांडो विंग येथे घडलेल्याया घटनेनंमोठीखळबळउडालीआहे. कमांडो प्रशिक्षण (Commando Training) दरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याचीमाहितीआहे.

Belgaum Accident : कमांडो प्रशिक्षण दरम्यान दुर्दैवी घटना, वाटेतच मृत्यू

मिळलेल्यामाहितीनुसार, मूळचे हरियाणा येथील असलेल्या लेफ्टनंट अमित सिंग हे कमांडो विंग येथे कमांडो प्रशिक्षण घेत होते. प्रशिक्षण दरम्यान स्विमिंग पूल मध्ये पोहत असताना अमित सिंग यांना हृदय विकाराचा झटका आला. यावेळी लाईफ गार्ड प्रदीप कुमार याने अमित सिंग यांना त्वरित पाण्यातून बाहेर काढले. अमित सिंग यांना लष्करी रुग्णवाहिकेतून त्वरित जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मात्रअचानकघडलेल्यायाघटनेनेपरिसरातशोककळापसरलीआहे.

Indian Navy : सागरातील नवा अग्रदूत: ‘तारागिरी’ भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांमध्ये होणार सहभागी

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात,  भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका, तारागिरी (एफ 41) येत्या 3 एप्रिल 2026 रोजी, नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विशाखापट्टणम इथे हा सोहळा होणार असून, भारतीय नौदलाला, सर्व दृष्टीने आत्मनिर्भर बनवण्यासाठीच्या प्रवासातला हा एक महत्वाचा टप्पा असेल. प्रकल्प 17 A श्रेणीतील, चौथी युद्धनौका असलेली ‘तारागिरी’, केवळ एक नौका नाही, तर भारताच्या ‘मेक इन इंडिया’ या दृढनिश्चयाचे, आणि भारतीय जहाजबांधणी केंद्राच्या अद्ययावत स्वदेशी अभियांत्रिकी कौशल्याचे, 6,670 टन वजनाचे ते एक मूर्तिमंत प्रतीक आहे.

मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स इथे तयार करण्यात आलेली ही युद्धनौका, या श्रेणीतल्या आधीच्या नौकांच्या संरचनेपेक्षा कितीतरी अत्याधुनिक, सरस असून, पुढच्या पिढीतले तंत्रज्ञान त्यात आहे. आकाराने छोटी, आणि लक्षणीयरित्या, छोटे रडार क्रॉस सेक्शन असलेल्या या युद्धनौकेची प्राणघातक स्टेल्थ क्षमता आहे.  याच्या बांधणीत, 75 टक्क्यांपर्यंत, स्वदेशी तंत्रज्ञान असून, देशांतर्गत औद्योगिक व्यवस्थेत झालेल्या विकासाचे चित्रही या बांधणीतून ठळकपणे अधोरेखित होते. देशभरातील 200 पेक्षा अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, सरकारच्या आत्मनिर्भर अभियानात आपले योगदान देत, अशा स्वदेशी बनावटीत हातभार लावत आहेत, ज्यातून, हजारो रोजगारही निर्माण होत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या