Beed Santosh Deshmukh Case News : बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विष्णू चाटे (Vishnu Chate)  याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. मकोका तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात (Beed Crime)  चाटेचा सहभाग असल्याचे सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक व्हॉइस सॅम्पल, असे पुरावे तपास यंत्रणेने सादर केले. त्यानंतर न्यायालयाकडून चाटे याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. आता विष्णू चाटे याला एका वर्षानंतर नव्याने जामिन अर्ज करता येणार आहे. (Santosh Deshmukh Case)

Continues below advertisement

Sarpanch Santosh Deshmukh Flashback : संपूर्ण चित्रपटगृहासारखा थरार

9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले या आरोपींनी संतोष देशमुख यांना टाकळी शिवारात सुदर्शन घुलेच्या शेतात नेले होते. तिथे आरोपींनी संतोष देशमुख यांना नग्न करून लोखंडी रॉड आणि गॅस पाईपने बेदम मारहाण केली. त्यांचे हात-पाय तोडून त्यांना अक्षरशः हालहाल करून मारण्यात आले. 

Continues below advertisement

अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, हे अमानुष हत्याकांड सुरू असताना आरोपींनी वाल्मिक कराड या परळीतील गुंडाला 'व्हिडिओ कॉल' (Video Call) करून हा सगळा प्रकार प्रत्यक्ष दाखवण्यात आला होता. वाल्मिक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता.

Beed Crime News : 1800 पानांचे चार्जशीट, 15 व्हिडिओ आणि 8 फोटो

या क्रूर हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ मकोका अंतर्गत कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात तब्बल 1,800 पानांचे दोषारोपपत्र  दाखल केले आहे.

आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांना हत्येचे थेट 15 व्हिडीओ आणि 8 फोटो मिळाले आहेत. यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करताना आणि आनंद साजरा करताना स्पष्ट दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले होते.

12 मार्च 2025 रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी झाली होती. संपूर्ण भक्कम पुरावे पाठीशी असल्याने आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला कारागृहातच ठेवण्याचा निर्णय दिला आहे.

अशातचआता  बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख  यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विष्णू चाटे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. मकोका तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत दाखल गुन्ह्यात  चाटेचा सहभाग असल्याचे सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक व्हॉइस सॅम्पल, असे पुरावे तपास यंत्रणेने सादर केले. त्यानंतर न्यायालयाकडून चाटे याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. आता विष्णू चाटे याला एका वर्षानंतर नव्याने जामिन अर्ज करता येणार आहे.

ही बातमी वाचा: