छत्रपती संभाजीनगर : बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्याला दोन दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती. काल प्रयागराजमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर सतीश भोसलेचा ताबा बीड पोलिसांना मिळाला आहे. बीड पोलीस भोसलेला ताब्यात घेऊन आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले आहेत. पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला बीडला घेऊन जातील, अशी माहिती आहे. काल रात्री खोक्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं गेलं आहे.
बीड पोलिसांनी सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून महाराष्ट्रात आणलं. युवकाला मारहाण केल्या प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. खोक्याचे युवकाला मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला होता. मात्र, तो पोलिसांना सापडत नव्हता. खोक्या फरार झाल्यानंतर काही काळ पुण्यात देखील होता. त्यानंतर तो पुन्हा बीडला जाऊन नंतर प्रयागराजला गेला होता.
सतीश भोसले उर्फ खोक्याचं लोकेशन प्रयागराजमध्ये ट्रेस झाल्यानंतर त्याला बीड पोलिसांनी प्रयागराजच्या पोलिसांशी समन्वय साधून अटकेची कारवाई करण्यात आली. खोक्याला ट्रान्झिट रिमांड घेऊन महाराष्ट्रात आणलं गेलं आहे. बीड पोलीस खोक्याला घेऊन छत्रपती संभाजीनगरमधून बीडच्या दिशेनं रवाना झाले आहेत. आता खोक्याला शिरुरच्या कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. आता पोलीस खोक्याला कोर्टात हजर करतील आणि पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती आहे.
खोक्याची अटक रितसर दाखवण्यात येईल. त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं जाईल. खोक्या फरार झाल्यानंतर त्याला पकडण्याचं आव्हान होतं.
प्रयागराजमध्ये खोक्याला ताब्यात घेतल्यानंतर रात्री साडे बाराच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झाले. यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आणण्यात आलं. शिरुर पोलीस ठाण्यात खोक्यावर गुन्हा असल्यानं तिथं त्याला हजर केलं जाईल. शिरुर पोलिसांकडे त्याला सोपवण्यात येईल. खोक्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल. यानंतर दुपारचया वेळी खोक्याला कोर्टात आणलं जाईल. त्यानंतर कोर्ट सतीश उर्फ खोक्याला किती दिवसांची कोठडी देतात हे पाहावं लागेल. खोक्यावर शिरुर कासार पोलीस स्टेशनला गुन्हा असल्यानं शिरुर कासार न्यायालयात हजर केलं जाईल.
इतर बातम्या :