एक्स्प्लोर

प्रेमसंबंधातून तरुणाला संपवलं, बीड पोलीसांची चक्रे फिरली, मुलीच्या वडिलांसह भाऊ अन् चुलत्याला अटक; 5 दिवसांची पोलीस कोठडी

आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पाऊण तास मृतदेह गेवराई पोलीस ठाण्याबाहेर ठेवून ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांची चक्रे फिरली व त्यांनी वडिलांसह भाऊ व चुलत्याला अटक केलीय.

Beed Crime: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे प्रेमसंबंधातून घडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या प्रकरणात मुलीचे वडील, भाऊ आणि चुलते अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. 

काय घडलं होतं नेमकं?

गंगावाडी गावातील शिवम काशिनाथ चिकणे (वय 21) या तरुणाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे रागाच्या भरात शिवमला मुलीच्या भावाने इतर नातेवाईकांच्या मदतीने बेदम मारहाण केली. या मारहाणी दरम्यान शिवमच्या डोक्यावर गंभीर मार लागला होता. जखमी अवस्थेत त्याला तत्काळ छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवमच्या नातेवाईकांनी आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी पाऊण तास मृतदेह गेवराई पोलीस ठाण्याबाहेर ठेवून ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांवर दबाव वाढल्यानंतर तपासाला गती मिळाली आणि तिघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या पूर्णतः पूर्वनियोजित आणि सूडबुद्धीतून झाल्याचं समोर येत आहे.

नेमकं काय घडलं होतं?

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी गावात प्रेमसंबंधामुळे झालेल्या मारहाणीत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवत जोरदार आंदोलन केलं. तब्बल पाऊण तास मृतदेह तलवाडा पोलीस ठाण्याबाहेर ठेवण्यात आला होता. यावेळी नातेवाईकांनी "आरोपींना अटक करा, न्याय द्या" अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणात मुलीच्या वडिलांना भावाला आणि चुलत्याला अटक करण्यात आली आहे. मात्र इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

हेही वाचा

Beed Crime: गेवराईत प्रेमसंबंधातून केलेल्या मारहाणीत तरुण दगावला, मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात पोहोचले, नेमका प्रकार काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
Bihar Election 2025: बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया
बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया
Video: गळ्यात झंडूच्या फुलाचा हार, डोळ्यावर गाॅगल अन् चक्क बिकिनी घालून परदेशी महिलेची गंगेत डुबकी; ऋषिकेशमधील व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ
Video: गळ्यात झंडूच्या फुलाचा हार, डोळ्यावर गाॅगल अन् चक्क बिकिनी घालून परदेशी महिलेची गंगेत डुबकी; ऋषिकेशमधील व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 23 OCT 2026 : ABP Majha
Thackeray Brother Bhaubeej : राज ठाकरे, उद्धव ठाकरे भाऊबीज निमित्त पोहचले बहिणीच्या घरी
Thackeray Reunion: भाऊबीजेच्या निमित्ताने Uddhav-Raj Thackeray पुन्हा एकत्र, चर्चांना उधाण
Dhangekar vs Mohol : धंगेकरांचा मोहोळांवर गंभीर आरोप, कारवाईच्या चर्चेनंतरही लढण्यावर ठाम
Nilesh Ghaywal Passport : गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द, परदेशातून आणण्यासाठी हालचाली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
Bihar Election 2025: बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया
बिहार विधानसभेसाठी इंडिया आघाडीकडून CM आणि DCM पदासाठीच्या उमेदवारांची घोषणा; तेजप्रताप यादवांची आश्चर्यजनक प्रतिक्रिया
Video: गळ्यात झंडूच्या फुलाचा हार, डोळ्यावर गाॅगल अन् चक्क बिकिनी घालून परदेशी महिलेची गंगेत डुबकी; ऋषिकेशमधील व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ
Video: गळ्यात झंडूच्या फुलाचा हार, डोळ्यावर गाॅगल अन् चक्क बिकिनी घालून परदेशी महिलेची गंगेत डुबकी; ऋषिकेशमधील व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियात खळबळ
Thackeray bhaubeej: ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी
ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी
Mumbai Fire News: मुंबईच्या जोगेश्वरीत अग्नितांडव, अडकलेल्या लोकांनी कपड्याला लपटून घेतले, दहाव्या मजल्यावरुन मदतीसाठी हाक, PHOTO
मुंबईच्या जोगेश्वरीत अग्नितांडव, अडकलेल्या लोकांनी कपड्याला लपटून घेतले, दहाव्या मजल्यावरुन मदतीसाठी हाक, PHOTO
Gold Price: 24 तासांत सोन्याचा भाव सहा हजारांनी कोसळला, चांदी सात हजारांनी स्वस्त; दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
24 तासांत सोन्याचा भाव सहा हजारांनी कोसळला, चांदी सात हजारांनी स्वस्त; दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड
Bihar Election 2025: बिहारमध्ये नितीशकुमारांची खूर्ची डळमळीत, पण महाआघाडीची 'तेजस्वी' चाल! मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा दिला, तर डेप्युटीसाठी..
बिहारमध्ये नितीशकुमारांची खूर्ची डळमळीत, पण महाआघाडीची 'तेजस्वी' चाल! मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा दिला, तर डेप्युटीसाठी..
Embed widget