Beed Crime Satish Bhosale: शिकारीचे साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्याला (Satish Bhosale Khokya Bhai) वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलाने दावा केला आहे. वकिलाने केलेल्या दाव्यानंतर खोक्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, सतीश भोसले याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सतीश भोसलेच्या पाठीवर वळ असल्याचे दिसून येत आहे. 

खोक्या उर्फ सतीश भोसले याला वन विभागानं ताब्यात घेतल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती त्याच्या वकिलाने दिली आहे. समोर आलेल्या फोटोंचा आधार घेत वकिलानं आरोप केला आहे. त्याचमुळे खोक्याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयानं वकिलाची ही मागणी मान्य करतानात सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पण वन विभागाच्या कोठडीत असताना खोक्याला नेमकी कोणी मारहाण केली, याबाबत आता प्रश्न उपस्थित केले जात आहे.

सतीश भोसलेने प्राण्यांनाही सोडलं नाही-

सतीश भोसले उर्फ खोक्याने शेकडो वन्य जीव, हरिण, काळवीट, ससे आणि मोरांची शिकार केली असल्याचा गंभीर आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच हरणांच्या पार्ट्या केल्याचे अवशेषही सापडत असल्याचा दावा शिरूर परिसरातील वन्यजीवप्रेमी माऊली शिरसाट यांनी केला आहे. परिसरात शेकडा हरणांचा वावर असताना ही हरणं कुठे गेली? ती हरणं यांच्या पोटात गेले की काय? असा माझा संशय आहे. सतीश भोसले आणि त्याची संपूर्ण टोळी हरणांची तस्करी करून त्याचा पैसा जमा करत असल्याने कदाचित त्यांच्याकडे सोनं, आलिशान गाड्या असू शकतात, अशी शंका देखील माऊली शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. 

कोण आहे सतीश भोसले उर्फ खोक्या? 

सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. 

संबंधित बातमी:

Satish Bhosale Arrested: बसने प्रयागराजला पोहचला अन् तिकडून सटकण्याची तयारी केली; खोक्या सतीश भोसले जाळ्यात कसा अडकला?

Beed Crime Satish Bhosale: खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणं पोलीस कर्मचाऱ्यांना भोवलं; तडकाफडकी करण्यात आलं निलंबन