बीड: शेतातील हरीण पकडण्यास मनाई केली म्हणून दिलीप ढाकणे या शेतकऱ्याला बेदम मारहाण करुन त्याचे दात आणि जबडा तोडणाऱ्या बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याच खोक्या भाईचा (Khokya Bhai) आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सतीश भोसले (Satish Bhosale) हा शाळेतील मुलांसमोर धमकीची भाषा वापरताना दिसत आहे. या व्हिडीओत सतीश भोसले नक्की कोणत्या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहे, याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र, तो शाळकरी विद्यार्थ्यांना सांगत आहे की, ज्यावेळेस सर काही करणार नाहीत, माझ्या हाताने काही होणार नाही. मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून जेलमध्ये जायला तयार आहे. माझ्यावर आधीपासून खूप मोठ्या केसेस आहेत. त्यामुळे एखाद्या लेकराबाळामुळे माझ्यावर आणखी एक केस पडली तर फरक पडत नाही. माझी तुम्हाला एवढीच वॉर्निंग आहे, असे खोक्या भाई या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. सतीश भोसले उघडपणे अशा धमक्या देत फिरत असताना बीड पोलीस कुठे होते, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा गुन्हेगारीचा इतिहास
बीड जिल्ह्यातील अमळनेर, शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये सतीश भोसले याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
1. कलम 307 (IPC 307) - 2021 प्रयत्नात्मक खून (Attempt to Murder)
2. कलम 498A (IPC 498A) - 2020 कौटुंबिक गुन्हा
3. कलम 304 (IPC 304) - 2020 गंभीर गुन्हा ठार मारण्याचा प्रयत्न नसताना घडलेला मृत्यु (Culpable Homicide Not Amounting to Murder)
4. आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल आहे.
5. शिरूर पोलिस स्टेशन मारहाणीचा गुन्हा..
6. BNS 115(2) - प्राणघातक हल्ला (गंभीर)
7. BNS 118(1) - जबरदस्तीने संपत्ती मिळवणे
8. BNS 189(2) - शासकीय कर्मचाऱ्यांना धमकी देणे
9. BNS 190 - फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा गैरवापर
10. BNS 191(2) - खोटी साक्ष किंवा खोटे पुरावे सादर करणे
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा; परभणीत कराड विरोधात आंदोलन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली. या हत्या प्रकरणात केवळ वाल्मीक कराड आणि त्याचे साथीदारच नाही तर धनंजय मुंडे यांचाही सहभाग असल्याचा आरोप करत या हत्या प्रकरणात त्यांना ही सहआरोपी करा, या मागणीसाठी आज परभणीचे सेलू शहर आणि तालुका बंद करण्यात आलाय शिवाय सकल मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. शुक्रवारी सकाळपासूनच सेलू बंद असून बाजारपेठ पूर्णतः कडकडीत बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे या बंदमुळे शहरासह तालुक्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
आणखी वाचा
बीडच्या खोक्या भाईला हरीण अन् मोरांच्या शिकारीचा शौक, विरोध करणाऱ्याचे 8 दात पाडले, जबडा मोडला