Beed Crime News: बीड (Beed) जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत माणुसकीला हादरवणारी आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने मोबाईल फोन घेऊन दिला नाही, या कारणावरून संतप्त झालेल्या महिलेने आपल्या चार वर्षीय चिमुकल्याला विहिरीत ढकलून दिले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या (Police) तपासात समोर आली आहे. (Beed Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील लिंबारुई गावातील एका विहिरीत 31 डिसेंबर 2025 रोजी प्राजक्ता उर्फ रामेश्वर दराडे आणि तिचा चार वर्षीय मुलगा वेदांत रामेश्वर दराडे यांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

Beed Crime News: पत्नीने देखील केली आत्महत्या

मात्र, या घटनेचा सखोल तपास करण्यात आल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, प्राजक्ता दराडे हिचा पतीसोबत मोबाईल फोनच्या कारणावरून वारंवार वाद होत होता. पतीने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने ती मानसिक तणावात होती. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलत प्रथम आपल्या चार वर्षीय मुलाला विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. खून करून या महिलेने आत्महत्या केल्याने यानुसार आता ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला गेला आहे. 

Beed Crime News: बीडमध्ये तृतीय पंथीयाकडून मद्यपीला मारहाण

दरम्यान, बीडच्या मध्यवर्ती बस स्थानकात एका तृतीय पंथीयाकडून मद्यपीला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्थानकात नेहमीच रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी आणि मद्यपिंचा वावर पाहायला मिळतो. आज मध्यरात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याने ही हाणामारी झाली. तृतीय पंथीयाने मद्यपीला जबर मारहाण केल्याचं यामध्ये दिसून येतंय. या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकल्या मुलीसोबत नको ते कृत्य, 72 वर्षीय नराधमाने घरात बोलावून घेतले अन्...; बीडमधील संतापजनक घटना

Beed Crime News: धावत्या रिक्षात अत्याचार झाल्याची तक्रार; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा, स्वतः तरुणीनंच बनाव रचला