Beed Crime News: बीडच्या अंबेजोगाईतील (Ambajogai) नामांकित शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय परिसरात असलेल्या संस्थेच्या एका शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला जात असल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना समजले असता, त्यांनी थेट शाळा गाठत याबाबत चौकशी केली. यानंतर शाळेत जात त्यांनी माहिती घेतली असता शाळेत एस.आय.एन.चर्च नाव असलेल्या कपाटात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी पुस्तके, जादूटोण्याच्या वस्तू, आणि नशेची औषध असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

Ambajogai News: संस्थेशी संबंध नसलेला व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा

दरम्यान, हा प्रकार शिक्षकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने होत असल्याचा त्यांनी सांगितलं. शाळेचा सबंध नसलेली एक व्यक्ती दर रविवारी ख्रिश्चन धर्माची प्रार्थना घेत असून गेल्या 15 वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान याबाबत आज सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात जात संस्थाचालकांना याचा जाब विचारला. या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर पुढील दोन दिवसात कारवाईची मागणी केली. तसेच संस्थेशी संबंध नसलेला व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, ही कारवाई न झाल्यास संस्थेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय.

Beed Crime News: संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले, आम्ही या प्रकरणात ताबडतोब चौकशी करणार

दरम्यान, या प्रकारबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालय, गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. कुठलीही शिक्षण संस्था, शाळा महाविद्यालय कुठलीही जागा धर्मप्रसाराचे कार्य करण्याची जागा नाही. हा स्थापनेपासूनचा विचार आहे, तो आम्ही आजही जपत आहोत. आम्ही या प्रकरणात ताबडतोब चौकशी करणार असल्याचे शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलेय.

Beed News : बीड जिल्ह्यातील 173 प्रकल्पातील पाणी पातळीत घट; जिल्हाधिकाऱ्यांचे पाणी उपसा करणाऱ्यावर कारवाईचे आदेश

बीड जिल्ह्यात गत वर्षी झालेल्या पावसामुळे 173 पाणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाले होते. मात्र आता जिल्ह्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि अवैध्य पाणी उपसा होत असल्याने 173 प्रकल्पातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचं पाहायला मिळतय. त्यामुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकल्पातील पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या छोट्या मोठ्या पाण्याच्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैध पाणी उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर देखील उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत.

इतर महत्वाच्या बातम्या