एक्स्प्लोर

Beed Crime News: चहा पाजतो म्हणून अपहरण केलं, दारू पाजत तब्बल तास डांबून मारहाण; घटनेनं बीडचं माजलगाव हादरलं!

Beed Crime News : बीड जिल्ह्यात पुन्हा अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात पाच ते सहा जणांनी एकाला दारू पाजल्यानंतर वाहनातून अपहरण करून सात तास बेदम मारहाण केलीय.

Beed Crime News : बीड जिल्ह्यात पुन्हा अपहरण करून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चहा पाजतो, असे म्हणून अप्पा काशिनाथ राठोड या माजलगाव तालुक्यातील जीवनापूर येथील व्यक्तीला दुचाकीवरून दूर नेले. तेथे पाच ते सहा जणांनी दारू पाजली. नंतर वाहनातून अपहरण करून राठोड यांना सात तास बेदम मारहाण (Crime News) केली. यात जखमीच्या डोक्यात सात टाके पडले असून, अंगावर सर्वत्र व्रण उमटले आहेत. हा प्रकार 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता घडला. यातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आलाय. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 

मारहाण करतानाचा गुंडांनी व्हिडीओही बनवला

दरम्यान, या मारहाणीच्या घटनेत गुंडांनी मारहाणीचा व्हिडीओ बनवल्याचीही माहिती समोर आली आहे. तर हाच व्हिडीओ व्हायरलची धमकी दिल्याचेही आप्पा राठोड यांनी सांगितलंय. 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता अपहरण करून पहाटे 3 वाजता सोडले. यादरम्यान खूप मारहाण करून व्हिडीओ बनवले, असेही ते म्हणाले. दरम्यान या प्रकरणात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणात फिर्यादी असलेल्या आप्पा राठोड याच्यावरच वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची ही माहिती समोर आली असून आता हा प्रकार नेमका काय आणि कशामुळे घडला? हे तपासात समोर येऊ शकणार आहे.

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री घेणार मुंबईत बैठक 

बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार असणार असून जिल्ह्यातील सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलावले जाणार आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय. मारहाणीचे व्हिडिओ सोशल माध्यमात वायरल होत आहेत. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी कोणाचीही गय केली जाणार नाही. असं ठणकावून सांगितले असून पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. याकरिता मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक असणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget