एक्स्प्लोर

Beed Crime News :अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; बीडच्या माजलगावात प्रशासनाची धावपळ

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका अल्पवयीन विवाहित तरुणीचा गर्भपात (Beed Crime News) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका अल्पवयीन विवाहित तरुणीचा गर्भपात (Beed Crime News) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विशेष म्हणजे हा गर्भपात माजलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्यात आल्याचा आरोप होत असून, या प्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे पीडित तरुणीची प्रकृती गंभीररीत्या (Crime News) खालावली आहे. प्रकृती बिघडल्यानंतर संबंधित तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, माजलगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्याचा दावा केला होता. मात्र, चौकशीअंती संबंधित तरुणी जिल्हा रुग्णालयात दाखलच झाली नसल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. गर्भपातासाठी शासनाने घालून दिलेले नियम आणि वैद्यकीय प्रक्रिया असताना त्या सर्व नियमांना बगल देत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सकही संभ्रमावस्थेत आहेत. उपचारानंतर संबंधित तरुणीचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तिचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

Beed Crime News : पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

दरम्यान, बालविवाह केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पती, सासू सासरे आणि पीडितेच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Majalgaon Crime : शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी पतीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये कारवाई

माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विवाह परभणी जिल्ह्यात लावून देण्यात आला होता. दरम्यान, 9 जून रोजी संबंधित मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी दरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी तसेच सासू-सासऱ्यांनी विवाहाला सहकार्य केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने आणि ती गर्भवती झाल्याने तिच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलिस तसेच पिंक पथकाकडून करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
शिर्डीत अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबीत, दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले प्रयोगशाळेत
शिर्डीत अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई, दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबीत, दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले प्रयोगशाळेत
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Embed widget