Beed:बीडमध्ये आता किरकोळ कारणांवरून हाणामारी, लोखंडी रॉड, तलवारी, बंदूका उपसणं धाकदपट काही नवे राहिले नाही. 28 एप्रिल रोजी गेवराई तालुक्यातील उमापूर गावात डॉक्टरसह मेडिकल चालकावर लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. डॉक्टरांना बाहेर बोलवा म्हणताच मेडिकल चालकानं पाच मिनिटं बसा म्हणल्याचा राग मनात ठेवून त्याने 10-12 जणांना लोखंडी रॉड,काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आल्यानंतर चकलांबा पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed Crime)
नक्की घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर अमोल पवार आणि मेडिकल चालक प्रवीण पवार हे रोजच्या प्रमाणे आपला दवाखाना बंद करून घरी परत जात होते. यावेळी गावातील एका कापसे नावाच्या व्यक्तीने पेशंट तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवले. मात्र मेडिकल चालकाने काही वेळ थांबण्याची विनंती केली. या गोष्टीचा राग मनात धरून कापसे आणि त्याच्यासोबत असलेल्या 10 ते 12 जणांनी अचानक दोघांवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड आणि लाकडी काठ्यांचा वापर करून डॉक्टर आणि चालकाला बेदम मारहाण केली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांची आत्महत्या
सोलापूर शहर आधी प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनं (Solapur Crime News) हादरलं होतं, त्यानंतर 12 दिवसांमध्येच शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टराने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी नस कापली त्यानंतर स्वतःचा गळा (Solapur Crime News) चिरून डॉक्टर आदित्य नांबियार (वय 24, रा. मुंबई) याने सोलापुरात आपल्या रूममध्ये आत्महत्या केली. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर 12 दिवसांत ही दुसरी घटना घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारणांचा पोलिस शोध घेत आहेत.
हेही वाचा: