Beed Crime :बीडच्या माजलगाव तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा गंभीर प्रकार (Beed Crime news) समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह नवरदेव, सासू आणि सासरे अशा पाच जणांविरोधात माजलगाव (Majalgaon Crime News) ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध बलात्कार (Crime News) आणि पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. (Majalgaon Crime News)

Majalgaon Crime : शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी पतीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये कारवाई

माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विवाह परभणी जिल्ह्यात लावून देण्यात आला होता. दरम्यान, 9 जून रोजी संबंधित मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणी दरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी तसेच सासू-सासऱ्यांनी विवाहाला सहकार्य केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Majalgaon Crime News : बालविवाह प्रकरणामुळे माजलगावमध्येखळबळ

दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने आणि ती गर्भवती झाल्याने तिच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलिस तसेच पिंक पथकाकडून करण्यात येत आहे.

Dharashiv Crime : पवनचक्कीच्या अल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद; 7.98 लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीसांनी पवनचक्कीच्या ३३ केव्ही विद्युत वाहिनीवरील अल्युमिनियम तारा चोरी करणाऱ्या टोळीविरुद्ध धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या तारांसह टाटा छोटा हत्ती वाहन आणि मोटारसायकल असा एकूण 7 लाख 98 हजार 152 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे  पोलिसांनी पाठलाग करून दोन आरोपींना ताब्यात घेतले, तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला.

इतर महत्वाच्या बातम्या