Beed Crime : बीड जिल्हा आहे की गँग ऑफ वासेपूर (Gangs of Wasseypur) सिनेमातील वासेपूर असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे. कारण जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत बीड जिल्ह्यात (Beed Crime) 36 खून झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) यांच्या मर्डरचाही समावेश आहे. सरपंच देशमुख यांच्याशिवाय मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे (Sarpanch Bapu Andhale Murder Case) यांचा देखील खून करण्यात आला होता. 


बीड जिल्ह्यात 10 महिन्यात 36 खून, 156 अत्याचाराच्या घटना 


जिल्ह्यात जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत 36 खून झाल्याची नोंद आहे. यात परळीतील सरपंचाच्या खुनाचाही समावेश आहे. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar) नेत्याचाही समावेश होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. याला अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी हा नेता अद्यापही एलसीबी आणि स्थानिक पोलिसांना सापडलेला नाही. तसेच खून करण्याचा प्रयत्न  केल्याच्याही 168 घटनाही घडलेल्या आहेत.


गर्दी करून मारामारी करणे, दंगल घडवणे यासारखे 498 गुन्हे 10 महिन्यांत दाखल आहेत. यातील 7 गुन्हे अजूनही उघड झालेले नाहीत..याशिवाय 156 अत्याचाराच्या 386 विनयभंग झाल्याच्या घटना देखील या कालावधीत समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यात महिला, मुली देखील सुरक्षित नाहीत. 10 महिन्यांत अत्याचाराच्या 156 तर विनयभंग, छेडछाडीच्या 386 घटना घडल्या आहेत...


दोन सरपंचांच्या हत्या झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ


बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांमध्ये दोन सरपंचाच्या हत्या झाल्या आहेत. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, बापू आंधळे यांच्या हत्येनंतर आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्हा हादरलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधी पक्षाकडून संसदेत आणि राज्याच्या विधीमंडळात देखील आवाज उठवण्यात आलाय. देशमुख यांच्या हत्येला जबाबदारी असणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही आरोपीला सोडणार नाही, असा शब्द दिला होता. मात्र, अजूनही या प्रकरणातील बरेचशे आरोपी फरार आहेत. 






इतर महत्त्वाच्या बातम्या 


Vasai Hit and Run : चिमुकला खेळताना खाली बसला, कारच्या चाकाखाली येऊनही पुन्हा उभा राहिला; वसईतील अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल