एक्स्प्लोर

Baramati Crime News: फेसबुकवर स्वस्त गव्हाचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लुटले; बारामती पोलिसांचा थरारक पाठलाग अन् 4 आरोपी जेरबंद, नेमकं काय घडलं?

Baramati Crime News: चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे 8 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बारामती : स्वस्त दरात गहू देण्याच्या आमिषाने फेसबुकच्या (Baramati Crime News) माध्यमातून व्यापाऱ्याला जाळ्यात ओढून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत लूट करणाऱ्या टोळीचा बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे 8 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(Baramati Crime News) या प्रकरणातील आरोपींमध्ये रवी संजय माने, श्रीकांत अर्जुन घुले, अभिषेक भाऊसो ठोंबरे आणि अतुल मोहन भोलणकर यांचा समावेश आहे. फिर्यादी सूरज सरजेराव गावडे (वय 27, रा. तासगाव, जि. सांगली) हे गव्हाच्या पिठाच्या व्यवसायात आहेत. फेसबुक मार्केटप्लेसवर “बाजारभावापेक्षा स्वस्त गहू” अशी जाहिरात पाहून त्यांनी संबंधित लिंकवर आपली माहिती नोंदवली. त्यानंतर आरोपींनी बनावट फेसबुक अकाउंटवरून संपर्क साधत त्यांना बारामती येथे येण्यास सांगितले.(Baramati Crime News)

Baramati Crime News:  पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू

4 मे 2026 रोजी गावडे हे आपल्या छोटा हत्ती टेम्पो व चालकासह रोख रक्कम घेऊन बारामतीत दाखल झाले. आरोपींनी त्यांना पेन्सिल चौक आणि त्यानंतर कल्याणी कॉर्नर येथे बोलावले. येथे एका संशयिताने स्कूटीवर येत “शेठने पाठवले आहे” असे सांगून त्यांना गहू दाखवण्याच्या बहाण्याने सोबत नेले. स्कूटीला नंबर प्लेट नव्हती आणि संबंधित व्यक्तीने चेहरा झाकला होता.(Baramati Crime News) यानंतर गावडे आणि त्यांच्या चालकाला पेंजिओ कंपनीच्या मागील बाजूस, पुलाचे काम सुरू असलेल्या निर्जन भागात नेण्यात आले. तेथे आधीच चारचाकी कारमध्ये इतर आरोपी थांबलेले होते. या ठिकाणी पोहोचताच आरोपींनी पिस्तूलाचा धाक दाखवत दोघांनाही मारहाण केली. गावडे यांच्या कपाळावर बंदूक रोखण्यात आली, तर चालकावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या खिशातील रोख रक्कम, चांदीच्या अंगठ्या, घड्याळ तसेच चालकाच्या कानातील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. “पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारू” अशी धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.(Baramati Crime News)

Baramati Crime News: सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील नोंदी आणि सायबर विश्लेषणाच्या मदतीने..

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील नोंदी आणि सायबर विश्लेषणाच्या मदतीने आरोपींच्या हालचालींचा माग काढण्यात आला. आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांनी शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी, खडकी, रावणगाव, कुरकुंभ, भिगवण आदी भागांत जाळे पसरवले. इंदापूर, भिगवण आणि वालचंदनगर पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. अखेर भिगवण परिसरात थरारक पाठलाग करत तिघांना गाडीसह ताब्यात घेण्यात आले. चौथ्या आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, दोन पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. विविध पोलिस ठाणे आणि सायबर पथकाच्या समन्वयामुळे ही मोहीम यशस्वी ठरली असून, या घटनेमुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virar Crime News: पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Pune Accident: पुण्यात रिक्षा-फॉर्च्युनरची जोरदार धडक, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जखमी
पुण्यात रिक्षा-फॉर्च्युनरची जोरदार धडक, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जखमी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
धक्कादायक! नाशिकमध्ये घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावाने 2 चिमुकल्यांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा हादरली, नागरिकांमध्ये भीती
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
दादा कोंडकेंसोबत काळ गाजवला, अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या; व्ही. शांताराम पुरस्कार शासनाला परत, आनंदाश्रमात ठेवला
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
पुण्यातील धक्कादायक घटना; वडिलांनीच मुलाच्या अंगावर ॲसिडसदृश्य द्रव्य फेकलं; गुन्हा दाखल होताच फरार
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
आता ऑस्ट्रेलियातही भारतीय वंशाचा थेरपिस्ट 'अशोक खरात' निघाला; मसाज पार्लरमध्ये मसाज करताना तब्बल 61 महिलांसोबत गुप्त व्हिडिओ करत नको नको ते कारनामे
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
शक्तिपीठ महामार्गाविरोधात पुणे-सोलापूर महामार्गावर रणरणत्या उन्हात आंदोलन; 75 वर्षीय वृद्ध महिला शेतकरी सुद्धा रस्त्यावर, राजू शेट्टी आणि पोलिसांची शाब्दिक चकमक
Bacchu Kadu on Eknath Shinde CM Post: महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Embed widget