Mushfiqur Rahim : एकदिवसीय क्रिकेटमध्ये बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा काढणारा दुसरा फलंदाज मुशफिकुर रहीम याने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. सोशल मीडियावरुन मुशफिकुर याने याबाबतची माहिती दिलीये. मी आज वनडे क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं 37 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम याने म्हटलंय.
मुशफिकुरच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद
बांगलादेशच्या दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या मुशफिकुर रहीम बांगलादेशसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. त्याने 274 सामन्यांमध्ये 7795 धावा काढल्या आहेत. मुशफिकुरच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 9 शतक आणि 49 अर्धशतक आहेत. बोगराच्या या फलंदाजाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील बांगलादेशचा प्रवास संपल्यानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केलीये.
'मी आज वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे'
सोशल मीडियावर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा मुशफिकुर रहीमने केलीय. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, मी आज वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतोय. वनडे क्रिकेटमध्ये आपल्याला मोठं यश मिळवता आलं नाही. मात्र, मी देशासाठी संपूर्ण समर्पण देऊन आणि ईमानदारीने खेळलो. मागील काही आठवडे माझ्यासाठी कठीण होते. कठिण काळाचा सामना करत असताना माझ्या लक्षात आलं की आता थांबलं पाहिजे. मी माझे कुटुंब, मित्र परिवार, मित्र आणि चाहत्याचे मनापासून आभार मानतो. त्यांच्यासाठी मी 19 वर्षे क्रिकेट खेळत राहिलो.
भारताविरोधात मुशफिकुरची नेहमीच दिमाखदार कामगिरी
मुशफिकुर हा तोच फलंदाज आहे ज्याच्यामुळे भारत 2007 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला होता. या सामन्यात भारताविरुद्ध 56 धावांची खेळी करत मुशफिकुरने बांगलादेशला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला होता. त्यामुळेच भारताला बाहेर पडावे लागले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या