Badlapur Uterine Eggs Selling Racket नाशिक : राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात (Badlapur Uterine Eggs Selling Racket) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीसतपासा बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचे नाशिक (Nashik Crime) कनेक्शन उघडकीस आलंहोतं. याप्रकरणीआता नाशिकमधील मालती आयव्हीएफ (IVF) सेंटरचा संचालक डॉ. अमोल पाटीलला बदलापूर पोलिसांनी काल (3 मार्च) रात्री उशिरा अटक केलीय. दरम्यान, आज डॉ. अमोल पाटीलला कल्याण सेशन कोर्टात हजर करण्यातयेणारआहे. डॉ. अमोल पाटीलवर सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे. त्यामुळेआजन्यायालयातनेमकंकायनिर्णयहोतोहेपाहणंआतामहत्वाचंठरणारआहे.

Nashik Crime News : नाशिक महापालिकेनेबजावली नोटीस; मालती IVF सेंटरच्या कागदपत्रची होणार तपासणी

दुसरीकडे, बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणाचीव्याप्तीवाढतअसतानाया प्रकरणा आंतरराष्ट्रीय स्त्रीबीज तस्करीचा रॅकेटअसल्याचाहीपोलिसांना संशय आहे. शिवायहेरॅकेट बदलापूर येथून चालत असल्याची माहिती पोलिसांनाप्राप्तझाल्याचीचर्चाआहे. तर आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यातआलाआहे. त्यामुळेयाप्रकरणी संशयित एजेंटचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळेयाप्रकरणाचेअजूनकाहीसूत्रधारसमोरयेण्याचीदाटशक्यताआहे. अशातच अमोल पाटीलला नाशिक महापालिकाने नोटीस बजावली आहे. त्यामुळेआता मालती आयव्हीएफ सेंटरच्या कागदपत्रची तपासणी होणारअसल्याचीमाहितीआहे.

नेमकं प्रकरण काय? (Badlapur Uterine Eggs Selling Racket)

बदलापूरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणलं. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यता आहे. 

इतरमहत्वाच्याबातम्या