Badlapur Crime News: बदलापुरात स्त्री बीज बेकायदेशीर विक्री प्रकारणाचे (Badlapur Uterine Eggs Selling Racket) कनेक्शन हे राज्याबाहेर असल्याचे तपासात समोर आले आहे. सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे यांना या प्रकरणात अटक करण्यात आलं आहे. यांच्या पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांकडून तिघींची कसून चौकशी करून त्यांचा कोणत्या डॉक्टर, हॉस्पिटल आणि IVF सेंटरसोबत कनेक्शन (Badlapur IVF Racket) आहे हे समोर येणार आहे. शिवाय या टोळीने महिलांचे बनावट आधार कार्ड तयार करून एकाच महिलाचं वेगवेगळ नाव वापरून तिला अनेकदा डोनर बनवलं आहे.

दरम्यान, या आरोपींनी आपल्या इतर टोळीच्या सदस्यांच्या मदतीने महिलांचे बनावट सत्यप्रतिज्ञा पत्र, आधार कार्ड, इतर बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही समोर आले आहे. तर आरोपींच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो, महिलांचे खोटे आधारकार्ड तयार करून डोनर बनवत असल्याचीधक्कादायकमाहितीसमोरआलीआहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचीअधिकचौकशीकरतअसूनयाप्रकरणाचीव्याप्तीवाढण्याचीशक्यताआहे.

Badlapur Crime: आरोपींच्या मोबाईलमध्ये बनावट कागदपत्रांचे फोटो, डोनर महिलांना 25 ते 30 हजार रुपये

दरम्यान, याप्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, या आरोपींच्या मोबाईलमध्ये असंख्य महिलांचे फोटो, इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफी करतानाचे फोटो, बनावट कागदपत्रांचे फोटो, आर्थिक व्यवहाराचे फोटो मिळून आले आहेत. 500 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांचा यासाठी वापर करण्याचा आल्याचा संशय आहे. डोनर महिलांना 25 ते 30 हजार रुपये दिले जात होते, तर आरोपी यात गरजू महिलांना हेरून त्यांच्यातील स्त्री बिजाची विक्री करायचे. या टोळीतील सदस्य विविध टप्प्यावर आपापली कामगिरी पार पाडत होते. पोलिसांची तीन पथक या प्रकरणातील तपास करत आहेत. त्यामुळेयाप्रकरणातआणखीकायनवीमाहितीउघडहोतेहेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

Badlapur Crime News: घरातूनच सुरू होता बेकायदेशीर प्रकार

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुलक्षणा जयवंत गाडेकर या महिलेने तिच्या घरातच स्त्रीबीज वाढीसाठी वापरली जाणारी इंजेक्शन्स बेकायदेशीररीत्या साठवून ठेवली होती. आर्थिक गरज असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना या प्रक्रियेसाठी तयार केले जात होते. डॉक्टरांचा योग्य सल्ला न घेता महिलांची सोनोग्राफी करून त्यांना संबंधित इंजेक्शन्स देण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. या इंजेक्शन्समुळे गर्भाशयातील स्त्रीबीजांची वाढ झाल्यानंतर त्या महिलांना IVF किंवा ART सेंटरमध्ये पाठवले जात होते.

इतर महत्वाच्या बातम्या