नाशिक : भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या फसवणुकीचे नवे प्रकार तपासात समोर येत असून, लोकांना धार्मिक आणि भावनिक पातळीवर गंडा घालण्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. विशेषतः शाकाहारी नागरिकांना दिशाभूल करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरात हा शाकाहारी व्यक्तींना “मासा हा पाण्यातील वनस्पती आहे” असे सांगून त्यांना प्रसादाच्या नावाखाली मासे खाण्यास भाग पाडत होता. काही जैन धर्मीय व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. “मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यात हाडे नसतात,” अशा खोट्या दाव्यांद्वारे त्याने लोकांची दिशाभूल केली आणि त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचे दिसून येत आहे.(Ashok Kharat) 

या प्रकारातून अनेकांकडून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तपासात उघड होत आहे. धार्मिक श्रद्धा, अंधविश्वास आणि अज्ञान यांचा फायदा घेत खरातने अनेकांना लुबाडले आहे. दरम्यान, विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत अशोक खरातच्या या बनवेगिरीचे अनेक पैलू उघडकीस येत असून, त्याच्या विरोधात आणखी गंभीर गुन्हे नोंदवले जाण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अशोक खरात याला न्यायालयीन कोठडी

आज अशोक खरातला (Ashok Kharat) न्यायलयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी खरातला (Ashok Kharat) न्यायलयाला कोठडी देण्यात आली आहे. उद्या पुन्हा एकदा खरातला कोर्टात हजर केलं जाणार आहे. अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, उद्या २ एप्रिलला पुन्हा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. 

भोंदू अशोक खरातकडे 4 सिमकार्ड

विशेष तपास पथकाकडून (SIT) त्याची कसून चौकशी सुरू आहे. काल चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.काल केलेल्या तपासात अशोक खरात (Ashok Kharat) चार वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरत असल्याचे समोर आले आहे. यापैकी एक क्रमांक हा केवळ व्हीआयपी व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी वापरला जात होता. दुसरा क्रमांक काही विशिष्ट भक्त आणि महिलांशी संवादासाठी वापरला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. तिसरा मोबाईल क्रमांक हा आर्थिक व्यवहार आणि पैशांशी संबंधित कामांसाठी वापरला जात होता, तर चौथा क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्कासाठी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने सर्व मोबाईल फोन आणि संबंधित क्रमांकांचा डेटा पुनर्प्राप्त (डेटा रिकव्हरी) करण्याचे काम हाती घेतले आहे. या डेटामधून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

भोंदू अशोक खरात 4 मोबाईल नंबर अन् कोणता कोणासाठी ते उघड

-1 नंबर फक्त व्हीआयपी (vip) लोकांसाठी वापरत माहिती समोर- तर दुसऱ्या नंबर हा विशेष काही भक्तांसाठी व महिलांसाठी वापरत असल्याची सूत्रांची माहिती- तर तिसऱ्या नंबर हा आर्थिक व्यवहार बघण्यासाठी वापरत असल्याची माहिती समोर-  तर चौथा नंबर हा सर्वसामान्य लोकांसाठी असल्याची माहिती

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: लैंगिक संबंधांसाठी अशोक खरात जोड्या जुळवायचा; स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर काय काय करायचा?, हादरवणारी माहिती

Ashok Kharat Case Nashik Crime News: भोंदूची पत्नी फरार, मुलगा ताब्यात; काल रात्री अशोक खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी, आता लेकासमोर बापाची चौकशी, नेमकं काय काय घडलं?