पुणे : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे टळला. पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे हा प्रकार घडला. सासवड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबोडी येथील शिवारात दुचाकीवरून आलेले दोन तरुण एका नवजात अर्भकाला जिवंत पुरणाचा प्रयत्न करत होते. सुदैवाने या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार पहिल्यानंतर त्यांनी त्या तरुणाला हटकले. त्यानंतर या तरुणांनी अर्भक तिथेच सोडून पळ काढला आहे. हे अर्भक आता सुरक्षित असून पोलिसांनी त्याला उपचारासाठी जेजुरी येथे पाठवले आहे.


फिल्म कलाकार असल्याचे सांगून चालवायचा चाईल्ड पॉर्नोग्राफीचे रॅकेट, सीबीआयची कारवाई


याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आंबोडी येथील एका शेतामध्ये दोन तरुण शेतात खड्डा खांदत होते. परिसरातील शेतात काम करणारे काही लोक या ठिकाणी आले असता त्यांना याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी लांबूनच त्यांना काय करताय? हे विचारले. मात्र, यानंतर त्यांनी तेथून दुचाकीहून पळ काढला. मात्र, जाताना ते अर्भक तिथेच सोडून दिले. यानंतर या नागरिकांनी सासवड पोलिसांना याबाबत माहिती दिली.


पोलिसांनी या अर्भकाला ताब्यात घेतले असून त्याला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. येथील तपासणी नंतर या अर्भकाला पुणे येथे ससून रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण डी.एस.हाके करीत आहेत.


पिंपरी चिंचवडमध्ये बहिणीनं प्रेमविवाह केला म्हणून वाहनांची तोडफोड; 12 वाहनांचं मोठं नुकसान