नाशिक : नाशिकच्या अशोक खरात (भोंदू बाबा) प्रकरणाचा भांडाफोड करणारे पत्रकार आणि 'खबरदार पुढारी'चे संपादक दत्तात्रय खेमनार यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत खरातच्या 'हाय-टेक' कार्यपद्धतीबद्दल आणि त्याच्या प्रभावाबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने पिडीतेवर केलेले अत्याचार त्याचबरोबर त्यांनी याप्रकरणी महिला आयोगाला दिलेलं पत्र (Nashik Crime News)त्याच्याबद्दल मागवलेले खुलासे याबाबत त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना दत्ता खेमनार म्हणाले की, खरातकडे असलेला मोबाईल हा सामान्य फोन नसून तो परदेशातील (Foreign Country) बनावटीचा आहे. त्यांच्या दाव्यानुसार, हा फोन आर्मी ग्रेड (Army Grade) सिक्युरिटी असलेला फोन आहे, जो भारतीय नौदलातील किंवा सैन्यातील लोक वापरतात तशाच फिचर्सचा आहे. या फोनमधील डेटा अत्यंत सुरक्षित असतो आणि त्याचे लॉक्स उघडणे सामान्य तंत्रज्ञांना शक्य नाही. पोलिसांनी हा फोन हस्तगत केला असून, त्यातील डेटा रिकव्हर केल्यानंतरच खरातने स्वतः चित्रित केलेले ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. हे व्हिडिओ कोणत्याही छुप्या (Hidden) कॅमेऱ्याने काढलेले नसून, खरातने स्वतःच्या मोबाईलवरून हे कृत्य करताना चित्रीकरण केले होते. (Nashik Crime News)

Continues below advertisement

संपत्ती आणि परदेश कनेक्शन

खरातची संपत्ती केवळ २०० कोटी नसून ती किमान ५०० कोटी रुपयांच्या आसपास असण्याचा अंदाज दत्तात्रय खेमनार यांनी व्यक्त केला आहे. यात त्याचे नाशिकमधील 'राजमहाल'सारखे घर आणि महागाड्या गाड्यांचा समावेश आहेखरातचे २६ ते २७ देशांमध्ये संबंध असून त्याने अनेक वेळा परदेश दौरे केले आहेत. त्याच्या मुलीच्या लग्नानंतर तो कायमचा परदेशात स्थायिक होणार होता, मात्र त्याआधीच ही कारवाई झाली, अशी माहिती देखील दत्ता खेमनार यांनी दिली आहे.(Nashik Crime News)

 दत्ता खेमनार यांनी जेव्हा या भोंदूबाबाची बातमी छापली, तेव्हा रुपाली चाकणकर यांनी त्यांना वैयक्तिक नंबरवरून फोन करून "तो बाबा तसा नाही, तुम्ही खुलासा करा" असे सांगत दबाव आणल्याचा दावा खेमनार यांनी केला आहे. चाकणकर यांच्याशी त्यांचे सुमारे ५ मिनिटे बोलणे झाले होते अशी माहिती देखील त्यांनी बोलताना दिली. तर आपण छापलेल्या बातमीत त्याच नाव नसतानाही खरातने ५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकलाच, पण त्यासोबतच राज्य महिला आयोगानेही पत्रकाराला नोटीस पाठवून पुराव्यांची मागणी केली होती, अशी माहिती देखील त्यांंनी दिली आहे. (Nashik Crime News)

Continues below advertisement

खरात महिलांना "तुझे आयुष्य चांगले करण्यासाठी तुझे शुद्धीकरण करावे लागेल" असे सांगून त्यांचे लैंगिक शोषण करायचा. यात तो अत्यंत घृणास्पद अघोरी कृत्ये करत असे. खरातकडे येणारे क्लायंट हे अत्यंत उच्चभ्रू वर्गातील असायचे, ज्यात आयएएस, आयपीएस अधिकारी आणि राजकारण्यांच्या कुटुंबातील महिलांचा समावेश होता. एका मोठ्या उद्योजकाकडून त्याने तब्बल २० कोटी रुपये उकळल्याचा खळबळजनक आरोपही दत्तात्रय खेमनार यांनी केला आहे. 

रुपाली चाकणकर आणि खरात यांचे 'ट्रस्ट' कनेक्शन

खेमनार यांनी असा दावा केला आहे की, अशोक खरातच्या आश्रमातील ट्रस्टवर रुपाली चाकणकर या 'डायरेक्टर' (संचालक) म्हणून कार्यरत होत्या. आश्रमाच्या पाठीवरील पाटीवर त्यांचे नाव असल्याचेही त्यांनी नमूद केले. खरात आणि चाकणकर यांचे केवळ फोटोच नाहीत, तर त्यांचे व्यावसायिक संबंध (Business Partners) असण्याची दाट शक्यता असून, पोलिसांनी त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि सीडीआरची (CDR) चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 

खंडणी आणि फसवणुकीचे मोठे आकडे

 खरातने एका बड्या उद्योजकाचे दुसऱ्या एका महिलेशी संबंध जुळवून दिले. नंतर ती महिला 'प्रेग्नंट' (गर्भवती) असल्याचे खोटे सांगून, त्या उद्योजकाला ब्लॅकमेल करत खरातने त्याच्याकडून २० कोटी रुपये उकळले. खरात बनावट रत्न आणि खडे लोकांना विकायचा. साध्या खड्याची किंमत साडेतीन ते पाच लाख रुपये सांगून त्याने अनेकांना लुटले आहे. 

'कॅप्टन' पद आणि मर्चंट नेव्हीचा बनाव

अशोक खरात स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घ्यायचा आणि तो मर्चंट नेव्हीमध्ये होता असा दावा करायचा. मात्र, तो खरंच कोणत्या दलात होता की नाही, याबाबत कोणतेही अधिकृत दस्तऐवज समोर आलेले नाहीत. तो केवळ या नावाचा वापर करून लोकांवर छाप पाडायचा. खरातला दारूचे (विशेषतः रम) प्रचंड व्यसन आहे. तो एक नंबरचा 'पेताड' (बेवडा) असून तो दारू पिऊन महिलांशी अश्लील कृत्य करायचा, असा दावा खेमनार यांनी केला आहे. तो स्वतःला ईश्वर मानायचा आणि महिलांना "तुझे शुद्धीकरण करावे लागेल" असे सांगून त्यांच्यावर अत्याचार करायचा. शिर्डी आणि नाशिकमध्ये त्याची मोठी बेनामी संपत्ती असून, इन्कम टॅक्स विभागाने याची चौकशी करण्याची गरज खेमनार यांनी व्यक्त केली आहे.

एक वर्षापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील खबरदार पुढारी या स्थानिक वृत्तपत्रात, थेट नाव न घेता "कॅप्टन भोंदूबाबा" या मथळ्याखाली वृत्त छापून आले होते. अशोक खरात याने वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रेय खेमनर यांना 5 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली होती. यासह महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील खेमनर यांना फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माफी मागा अन्यथा गुन्हा दाखल करायला लावते, अशी धमकीच रुपाली चाकणकर यांनी दिल्याचा आरोप खेमनर यांनी केला आहे. तसेच महिला आयोगाकडून 'सुमोटो' गुन्हा दाखल करण्यासाठी चाकणकर यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिल्याचा दावाही खेमनर यांनी केला आहे.