Ashok Kharat Wife Kalpana Kharat: अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातचे (Ashok Kharat) काळे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. शिर्डीतील आर्थिक फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीच्या गुन्ह्यात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हीदेखील मुख्य आरोपी आहे. सध्या अशोक खरात नाशिक पोलिसांच्या कोठडीत असताना, त्याची पत्नी कल्पना खरात मात्र गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. दरम्यान, अटक टाळण्यासाठी तिने राहता न्यायालयात धाव घेतली असून, तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

Continues below advertisement

Ashok Kharat Wife Kalpana Kharat: कोण आहे ही कल्पना खरात?

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, कल्पना खरातचे मूळ नाव सुनीता शिंदे आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी हे तिचे जन्मगाव. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळी गावात सातवीपर्यंत झाले, तर माध्यमिक शिक्षण ठाणगाव येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. 1993 साली तिचा विवाह अशोक खरातशी झाला आणि सुनीता शिंदेची 'कल्पना खरात' झाली. दोन मुली आणि एक मुलगा असा तिचा परिवार असून, अशोक खरातच्या काळ्या साम्राज्यात तिची मोठी भागीदारी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Ashok Kharat Wife Kalpana Kharat: गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि लुक आऊट नोटीस

31 मार्च रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात अशोक खरात, कल्पना खरातसह पाच जणांवर आर्थिक फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून ते सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार असल्याने शिर्डी पोलिसांनी 1 एप्रिल रोजी तिच्याविरुद्ध 'लुक आऊट नोटीस' जारी केली होती. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी अरविंद बावके याच्या नावाने कल्पना खरातने 'पॉवर ऑफ ॲटर्नी' दिली होती, ज्यावरून आर्थिक व्यवहारांमधील तिची सक्रियता स्पष्ट होते.

Continues below advertisement

Ashok Kharat Wife Kalpana Kharat: न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

शिर्डी शहरात अनेक ठिकाणी भागीदारीत जमिनी आणि मालमत्ता असलेल्या कल्पना खरातला पोलीस शोधत आहेत. दुसरीकडे, तिने राहता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय तिला दिलासा देणार की तिचा जामीन अर्ज फेटाळून तिची रवानगी पोलीस कोठडीत होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

Nashik Crime News: 'तुला विशिष्ट पोशाख छान दिसेल, आपण एकदा ट्राय करू', तरुणींना विश्वासात घेतलं अन्...; नाशिकच्या कंपनीतील धर्मांतराची चक्रावणारी माहिती