पुणे:  राज्यभर गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. खरातने (Nashik Kharat case) अनेक पिडीत महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्याची, त्याचबरोबर अनेक धमकावून जमीनी मालमत्ता घेतल्या असल्याचं, त्याचबरोबर फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापलं आहेस, अनेक नेत्यांचे आणि बड्या अधिकाऱ्यांचे भोंदूबाबा अशोक खरात सोबत चांगलं कनेक्शन होते, अनेक नेत्यांच्या घरी तो जात होता, अनेक नेते त्याच्या भेटीसाठी येत होते, त्याचे फोटो देखील समोर आले आहेत, यावरून वातावरण तापलं असतानात आता या संपूर्ण प्रकरणावरती भिडे गुरुजींनी प्रतिक्रिया दिली आहे. (Nashik Kharat case)

Continues below advertisement

खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये

"अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये", नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर भिडे गुरुजी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

भोंदू बाबा अशोक खरातच्या संस्थांचे बँक अकाऊंट सील 

भोंदू बाबा अशोक खरातच्या संस्थांचे बँक अकाऊंट सील करण्यात आले आहे, त्याच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे. विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली आहे. कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी सुरू आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास सुरू आहे. बेनामी मालमत्ता असल्याचा संशय आहे, पुढील 2–3 दिवसांत तपासाला वेग येणार आहे.

Continues below advertisement

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिस तपासाला नवे वळण

बड्या आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार आहे. खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय आहे. नाशिकरोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर आहेत. संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती आहे. अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे. 

व्हॉट्सॲप (WhatsApp) डाटा रिकव्हर करण्यासाठी प्रयत्न

भोंदू अशोक खरात प्रकरणी सर्व गुन्हे विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आहेत. यापुढील तपास एसआयटीच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान अशोक खरातच्या मोबाईल मधील काही संभाषण तसेच व्हॉट्सॲप (WhatsApp) डाटा रिकव्हर करण्यासाठी सायबर पोलिसांकडून ही प्रयत्न केले जात आहेत. तसंच नाशिक पोलिसांकडे दाखल झालेले ८ गुन्हे, तर वावी आणि सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी एक अशा १० गुन्हांचा एसआयटी तपास करणार आहे.

भोंदू अशोक खरात याच्याशी संबंधित आतापर्यंत दाखल सर्व 10 गुन्ह्याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. अशोक खरात याच्यावर नाशिक पोलिसांत 8 गुन्हे दाखल झाले आहेत, तर वावी पोलिसात अशोक खरात याने दिनेश परब आणि राजेंद्र जासूद विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, शिर्डी पोलिसांत अशोक खरातच्या ऑफिसबॉय विरोधात गुन्हा दाखल आहे हे सर्व गुन्हे एकमेकांशी संलग्न असल्यानं सर्व गुन्ह्याचा एकत्रित तपास एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल. एसआयटीच्या टीमने काल रात्री  नाशिक क्राईम ब्रँच कडून डीव्हीआर (dvr) सीसीटीव्ही (cctv) लॅपटॉप, कागदपत्रे यासह सर्व मुद्देलमाल ताब्यात घेतला आहे, या सर्व प्रकरणाचा एकत्रित तपास आता केला जाणार आहे.