Ashok Kharat Case Nashik News: अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरला आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतेय. आज अशोक खरातला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आज न्यायालयात पोलिसांकडून काय बाजू मांडली जाते आणि पोलीस कोठडीत किती वाढ होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. याचदरम्यान, एक महत्वाची बातमी समोर आली आहे. (Ashok kharat Case Nashik Crime News)
ती महिला प्रेग्नंट झाली, तु हे काय केलं? (Ashok Kharat Case Nashik)
अशोक खरात पहिले महिलांचे लैंगिक शोषण करुन नंतर यातील पीडित व इतर काही महिलांचाही धनिक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वापर करत होता. यावेळी एका प्रकरणात एक महिला आणि बड्या उद्योगपतींमध्ये शारीरिक संबंध झाले. यानंतर अशोक खरातने संबंधित बड्या उद्योगपतीला फोन केला आणि तू ज्या महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवले, ती महिला प्रेग्नंट राहिली. तु हे काय केलं?, आता हे प्रकरण मिटवायला लागेल, असं सांगितले. मात्र संबंधित महिला प्रेग्नंट नव्हती. अशोक खरातने खोटं सांगून बड्या उद्योगपतीकडून टप्प्याटप्याने 20 कोटी रुपये लाटले. याबाबत महिलेला कोणतीही कल्पना दिली नाही, अशी माहितीही समोर आली आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्याची खरातला लागली कुणकुण- (Ashok Kharat Viral Video)
भोंदूबाबा अशोक खरातला अटक होण्याआधीच त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकूण लागली होती. या प्रकरणातील पीडितांनी खरातवर कारवाई करण्यासाठी एका आमदाराची भेट घेतली होती. मात्र पीडितांच्या हाती निराशा पडली. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानावर हे प्रकरण गेल्यानंतर त्याला वाचा फुटली. व्हिडीओ दाखवत पीडित कुटुंबानं आमदाराला आपबीही सांगितली. मात्र संबंधित आमदारानं या प्रकराला वाचा फोडण्याऐवजी उलट खरातलाच तक्रारीविषयी माहिती दिली. त्यामुळे प्रकरण दडपण्याच्या उद्देशानं खरातनं पीडितेच्या पतीवर गुन्हा दाखल केला. मात्र पीडितांनी हार न मानता दुसऱ्या आमदाराची भेट घेतली आणि संबंधित आमदारानं मुख्यमंत्र्यांच्या कानावर हे प्रकरण घातलं आणि त्यानंतर या सर्व अत्याचारकांडांला वाचा फुटली. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
नेमकं प्रकरण काय? (Nashik Ashok Kharat Case)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. 'शिवनिका ट्रस्ट'च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
