Ashok Kharat Nashik Crime: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सातत्याने चौकशी सुरु आहे. पोलिसांनी अशोक खरात (Ashok Kharat) याला ताब्यात घेतल्यापासून त्याच्यावर अनेक गु्न्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे एका गुन्ह्याची (Crime News) चौकशी संपली की दुसऱ्या गुन्ह्याची चौकशी सुरु होत आहे. यामुळे सध्या अशोक खरात याची एसआयटीकडून (SIT probe) दररोज आठ ते दहा तास चौकशी सुरु आहे. यामुळे अशोक खरात हा मानसिकरित्या खचला असून आता मरणाची भाषा बोलू लागला आहे. याच अशोक खरात याने आपण दैवी अवतार सांगत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. (Nashik Crime news)
सूत्रांच्या माहितीनुसार, अशोक खरात याची मानसिक स्थिती सध्या खालावली आहे. 'मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे', असे तो चौकशीदरम्यान बोलल्याचे समजते. अशोक खरात याच्यावर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या यापैकी तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी त्याची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. त्याने चौकशीत फसवणुकीचा गुन्ह्याची कबूली दिल्याचे समजते. याशिवाय, अशोक खरात याच्यावर अनेक महिलांनी धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मात्र, हा गुन्हा अद्याप अशोक खरात याने कबूल केलेला नाही. एसआयटीच्या आतापर्यंतच्या तपासात अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण करण्यासोबतच आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, एसआयटीने अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात या दोघांची तीन बँक खाती सील केल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने दोघांच्याही संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरु आहे. अशोक खरात याच्या नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी सुरु आहे. खरातच्या मालमत्तांवरही टाच येण्याची शक्यता आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीकडून अशोक खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच ईडीकडूनही अशोक खरात याची चौकशी होण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे दिवसेंदिवस अशोक खरात याचा पाय खोलात चालला आहे.
Nashik Crime news: अशोक खरात श्रीमंत भक्तांना दाखवायचा ईडीची भीती
अशोक खरातकडे जे भक्त येत होते, त्यापैकी खरात अंधविश्वास ठेवणाऱ्या श्रीमंत भक्तांची एक यादी तयार करत असे. या भक्तांना खरात तुमच्यावर ईडी किंवा आयकरची धाड पडेल, अशी भीती दाखवायचा. तुमचे पैसे माझ्याकडे ठेवा किंवा माझ्यासोबत जमिनीत गुंतवा, असे सांगून अशोक खरात या भक्तांकडून पैसे उकळायचा, असे चौकशीत समोर आले आहे.
आणखी वाचा
