Ashok Kharat Nashik Crime News: धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अशोक खरातच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी) खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे, एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: SIT च्या हाती लागले धक्कादायक पुरावे

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती लागले आहे. या व्हिडिओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून येत असून, यामुळे खरातच्या विरोधातील लैंगिक शोषणाचे गुन्हे अधिक प्रबळ झाले आहेत. एका सीएनेच कुकला फार्महाऊसवर तैनात करून खरातचे सर्व कारनामे उघड केले आहेत. आता या संशयास्पद व्हिडिओतून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: आज कोठडी संपणार, पुन्हा न्यायालयाकडे धाव

महिला लैंगिक अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात अशोक खरातला दिलेली तीन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने आणि पुराव्यांची साखळी वाढत असल्याने, एसआयटी (SIT) पुन्हा एकदा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. जर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली, तर पोलीस त्याला पुढील गुन्ह्यांत ताब्यात घेण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातची चौकशीत टाळाटाळ, ‘काही आठवत नाही’चा दावा

दरम्यान, महिला अत्याचार प्रकरणातील सहाव्या गुन्ह्यात अटक झालेला अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून SIT कडून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र, तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे. आधी प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करणारा खरात आता ‘काही आठवत नाही’ असे सांगत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यापूर्वीही डोकेदुखी आणि प्रकृती अस्वस्थ असल्याचा बहाणा करत चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Nashik Court Hearing: अशोक खरातचे वकील कोर्टात संतापले, म्हणाले, एसआयटी सारखं तेच पाणी आणि पेढे करत बसलेय, न्यायाधीशांचा महत्त्वाचा निर्णय